
कळंगुटचे पंच सदस्य प्रसाद शिरोडकर यांनी ६१ व्या जत्रोत्सवानिमित्त श्री देव बाबरेश्वर यांना ‘चांदीचं कडं’ दान केलं.
विजय तोरस्कर यांची तोरसे येथे उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड. सरपंच- छाया शेट्ये, सदस्य रमेश बुटे, उत्तम वीर, प्रार्थना मोटे, पूजा साटेलकर यांनी अभिनंदन केले आहे.
बागा येथील मच्छिमारांनी 15+ खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधून बेकायदेशीर सांडपाणी सोडल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे, ज्यामुळे आरोग्यास धोका आणि नदीजवळ प्रदूषण होते. अनधिकृत सांडपाण्याच्या टाक्या ओसंडून वाहत असून, मासेमारीच्या बोटीजवळ कचरा टाकला जात आहे. मच्छिमारांनी आमदार, कळंगुट पंचायत, पर्यटन विभागाकडे कारवाईचे आवाहन केले आहे.
गोवा वीज विभागाने टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर धोरण २०२० आणि टेलिकम्युनिकेशन (राईट ऑफ वे) नियम २०२४ अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून पाच टेलिकॉम कंपन्यांवर एकूण १२६ कोटी दंड ठोठावला. यासोबतच १८ टक्के जीएसटी अतिरिक्त आकारण्यात येईल
१. ग्रीन फायबर : ३ कोटी अधिक १८ टक्के जीएसटी
२. सिटीनेट : ६० लाख अधिक १८ टक्के जीएसटी
३. एजकॉम टेलिकम्युनिकेशन प्रा. लि. : ३ कोटी अधिक १८ टक्के जीएसटी
४. फास्टजेट टेलिकॉम प्रा. लि. : ३ कोटी अधिक १८ टक्के जीएसटी
४. डिजिटल नेटवर्क्स असोसिएट्स प्रा. लि. : ३ कोटी अधिक १८ टक्के जीएसटी
बोरी एमपीएल येथे आज शांततापूर्ण केलेल्या आंदोलनात नागरीकांतर्फे कंपनीच्या मॅनेजरला प्रदूषण कमी करण्यासाठी निवेदन सादर. ३१ मार्च पर्यंत प्रदूषण कमी केले नाही तर उच्च न्यायालय मध्ये जाणार असल्याचा नागरिकांकडून इशारा.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी मतदार संघातील लोकांशी चर्चा केली तसेच त्यांच्या समस्यांवर तोडगा काढून, महत्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे आश्वासन दिले.
बेळगाव न्यायालयाने अमीरसुहिल शकीलसाब सनदीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. माजी आमदार लवू मामलेदार यांच्या मृत्यूप्रकरणी सनदीला अटक करण्यात आली होती.
डॅनियली लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपी विकट भगतला मडगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
आश्वे मांद्रे येथे आजोबा मंदिराजवळ असलेल्या एका रिसॉर्टला आग. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू
मुळे-परोडा येथील स्थानिकांचा नवीन हॉट मिक्सिंग प्रकल्पाला विरोध. ग्रामस्थांनी स्थानिक पंचायत, आमदार आणि सरकारला प्रदूषणकारी उद्योग बंद करण्याची विनंती केली. दैनंदिन जीवन आणि आरोग्याचे रक्षण करण्याच्या त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास ट्रक अडविण्याचा इशारा त्यांनी दिला.
पिळगावच्या श्री शांतादुर्गा देवस्थानचा कलशारोहण. शंकराचार्य पिठाचे वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांच्या उपस्थितीत सोहळा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.