Goa News: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोवा दौऱ्यावर; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa Marathi Breaking News 09 December 2024: डिचोली नवा सोमवार, INDIA आघाडीतील वाद, यासह गोव्यातील राजकारण, कला-क्रीडा-संस्कृती, गुन्हे, पर्यटन विश्वातील महत्वाच्या बातम्या.
Goa News: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोवा दौऱ्यावर; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी
Published on
Updated on

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोवा दौऱ्यावर!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते कैलाश विजयवर्गीय गोवा दौऱ्यावर. सावंत सरकारमधील मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी दाबोळी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.

वाळपई अपघात! मोटारसायकलस्वार गंभीर जखमी

नाणूस-वाळपई येथे कार आणि मोटासायकल यांच्यात भीषण अपघात, ज्यामध्ये मोटारसायकलस्वार गंभीर जखमी.

Tanvi Vast Case: गोमंतकीयांना चुना लावणाऱ्या तन्वी वस्तला 4 दिवसांची पोलिस कोठडी!

गोमंतकीयांना गंडा घालणाऱ्या तन्वी वस्तच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. तन्वीला पुन्हा एकदा न्यायालयाने झटका दिला. तन्वीला चार दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली.

मुख्यमंत्र्यांच्या वाढत्या लोकप्रियतेची विरोधकांना धास्ती!

मुख्यमंत्र्यांच्या वाढत्या लोकप्रियतेची विरोधकांना धास्ती. 'कॅश फॉर जॉब' प्रकरणात विरोधकांकडे मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील कोणत्याच व्यक्तिविरोधात पुरावा नाही. भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकरांचा पत्रकार परिषदेत दावा.

'कॅश फॉर जॉब' प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या पत्नींवर बिनबुडाचे आरोप!

सरकार आणि प्रशासन सुरळीत सुरु आहे. मात्र ते न पाहवत असलेल्या विरोधकांकडून मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींवर बिनबुडाचे आरोप केले जातायेत. आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेतील आरोप तथ्यहीन असल्याचे मंत्री सुभाष फळदेसाईं यांनी म्हटले.

डिचोलीत भाजपमध्ये अंतर्गत कलह? नगराध्यक्ष कुंदन फळारींविरोधात अविश्वास ठराव

डिचोलीत भाजपच्या 3 नगरसेवकांची भाजपविरोधी 6 नगरसेवकांसोबत हातमिळवणी. एकूण 14 नगरसेवकांची संख्या असलेल्या डिचोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष कुंदन फळारींविरोधात 9 नगरसेवकांकडून अविश्वास ठराव दाखल.

कोलवाळ येथील औद्योगिक वसाहतीजवळील भंगार अड्ड्याला भीषण आग

कोलवाळ येथील औद्योगिक वसाहतीजवळील भंगार अड्ड्याला भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलासह कोलवाळ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

स्मार्ट सिटीच्या कामासाठी पणजीत पुन्हा रस्त्यांचे खोदकाम; वाहतूक कोंडीच्या समस्येने गोमंतकीय हैराण

स्मार्ट सिटीच्या कामासाठी पणजीतील रस्त्यांचे पुन्हा खोदकाम सुरु झाल्याने अनेक भागांत वाहतूक कोडींची समस्या निर्माण झाली आहे.

कोरगावात उपसरपंच पदी दिवाकर जाधवांची निवड

कोरगाव उपसरपंच पदी दिवाकर जाधव यांची निवड. काही दिवसांपूर्वी माजी उपसरपंच उमेश च्यारी यांच्यावर अविश्वास दाखल करण्यात आला होता.

विद्यापीठात निवडणुकीला सुरुवात

गोवा विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या (GUSC) निवडणुकीला केमिकल सायन्सेस कॉम्प्लेक्समध्ये सुरूवात.

बजरंग दल शौर्य यात्रेला गोवेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गोवा बजरंग दल विभागाकडून आयोजित शौर्य यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

डिचोली शहर भक्तीमय..!

डिचोलीतील 'नवा सोमवार' उत्सवाला प्रारंभ. गावकरवाडा येथील श्री शांतादुर्गा आणि आतील पेठेतील मठ मंदिरात साजरा होतोय उत्सव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com