Mapusa Plastic Ban Action: सरकाराने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असला तरी, या कायद्याची अंमलबजावणी कटाक्षाने होताना दिसत नाहीय. आजही म्हापसा बाजारपेठेत सिंगल यूज प्लास्टिक किंवा प्लास्टिक पिशव्या वापरल्या जात आहेत.
प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असली तरी देखील ग्राहकांच्या हातात आजही पिशव्या दिल्या जाताहेत. पालिका अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या बंदीचा फारसा फरक जावणत नाहीय. तसेच विक्रेत्यांकडून आजही चोरुन याच पिशव्यांचा वापर होताना दिसतोय.
मार्केटमध्ये प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अद्यापही काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. किरणा माल, स्टेशनरी, स्वीट मार्ट यासह फळ, फूलविक्रेत्यांकडून याच पिशव्यांमधून सामान दिले जाते.
प्लास्टिक पिशव्यांचा बदल्यात कोणताही ठोस पर्याय अद्याप उपलब्ध करून दिला गेला नसल्याने दुकानदार, छोटे विक्रेते, मोठे व्यावसायिक यांच्यापुढे व्यवसाय करायचा कसा, असा प्रश्न एका दुकानदाराने उपस्थित केला.
त्यामुळे नाईलाजस्तव सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करावा लागतो, असेही त्याने सांगितले. आजही मार्केटमध्ये ग्राहकांना छोट्या छोट्या वस्तू पिशव्यांमधूनच दिल्या जाताहेत. विशेषतः ग्राहकांकडूनही पिशव्यांमधून सामान देण्याची मागणी होत असल्याने दुकानदारही त्याची पूर्तता करतात.
अधिकतर, फळ व फूलविक्रेते याच पिशव्यांचा वापर करताना दिसतात. तसेच काही किराणावाले सिंगल यूज प्लास्टिकवरच विसंबून आहेत. शीतपेयांच्या दुकानांत किंवा उसाच्या गाड्यांवर सर्रासपणे प्लास्टिकचे स्ट्रॉ तसेच प्लास्टिकचे ग्लास दिले जातात.
"म्हापसा बाजारपेठेत सिंगल यूज प्लास्टिकवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. पालिका निरीक्षक, झोन पर्यवेक्षक यांच्यासह यापुढे प्रभाग पर्यवेक्षकांना देखील कारवाईचे अधिकार देण्याबाबत विचार सुरू आहे. प्लास्टिक बंदीची जबाबदारी ही प्रशासनासोबत प्रत्येक व्यक्तीची आहे. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी."
- शुभांगी वायंगणकर, म्हापसा नगराध्यक्ष
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.