Mapusa Consumers : चांगल्या-स्वच्छ माफक दरातील मालामुळे ग्राहकांची खरेदीसाठी रिघ

खरेदीसाठी रिघ : सर्व वस्तू एकत्र मिळण्याचे एकमेव ठिकाण
Mapusa Consumers
Mapusa ConsumersDainik Gomantak

Mapusa Consumers म्हापसा येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या म्हापसा कन्झ्युमर्स (म्हापसा बझार)या सोसायटीमध्ये गणेश चतुर्थीसाठी लागणारा माल खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. सर्व वस्तू एकत्र मिळण्याचे हे एकमेव ठिकाण असून, गेल्या 60 वर्षांपासून ही सोसायटी या ठिकाणी कार्यरत आहे.

म्हापशातील आणि बार्देश तालुक्यातील सर्वांत जुनी सोसायटी म्हणून म्हापसा कन्झ्युमर्स सोसायटीकडे ग्राहक पाहत आहेत. चांगला आणि स्वच्छ माल माफक दरात मिळत असल्यामुळे ग्राहक मोठ्या संख्येने उलाढाल करीत आहेत.

Mapusa Consumers
Mayem Lake: जगप्रसिद्ध मये तलावाला प्रतीक्षा पर्यटकांची; गतवैभवासाठी विकास आवश्यक

सणासुदीच्या दिवशी तर या म्हापसा मुख्य शाखा त्याचप्रमाणे अन्साभाट म्हापसा व दत्तवाडी म्हापसा या शाखांकडेही ग्राहक, संस्थेचे सभासद आपल्या घरी सणासाठी लागणारा माल आणण्यासाठी गर्दी करतात.

या सोसायटीला नुकतेच साठ वर्षे पूर्ण झालेले असून या सोसायटीमधील संचालक मंडळातील अध्यक्ष शिवानंद धावजेकर यांच्या नेतृत्वाखाली इतर संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग एकमेकांच्या सहकार्याने काम करत असल्याने सोसायटी चांगल्या तऱ्हेने चालत आहे.

Mapusa Consumers
Mumbai Goa Highway: खरचं मुबई - गोवा महामार्गाची सिंगल लेन सुरु झाली का? कोकणात येणारे प्रवासी काय म्हणताहेत?

लोकोपयोगी विविध योजना

ही सोसायटी ग्राहकांसाठी दरवर्षी गणेश चतुर्थी, दिवाळी, ख्रिसमस व नव्या वर्षासाठी वेगवेगळ्या योजना आणते आणि 200 रुपयांच्या कुपनावर चांगल्या वस्तू लॉटरीद्वारे काढल्‍या जातात. त्यामध्ये टीव्ही, फ्रिज, वॉशिंगमशीन तसेच इतर चांगल्या वस्तू ठेवल्या जातात आणि या वस्तूंचा फायदा ग्राहकांना मिळतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com