कळसा-भांडूरा प्रकल्पाच्या संयुक्त पाहणीला कर्नाटक सरकार नेहमी विरोध करीत आले आहे. ज्यांची बाजू खोटी आहे तेच विरोध करतात. आज (25 ऑक्टोबर) झालेल्या प्रवाह प्राधिकरणाच्या बैठकीत देखील त्यांनी विरोध केला. प्रवाह समितीच्या अध्यक्षांनी हा विषय केंद्रीय जल आयोगाकडे मांडण्याचे ठरवले आहे. साधारण महिन्याभरात आम्हाला यावर निकाल मिळेल.- जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती.
भाषेच्या इतिहासाबाबत रोमी कोंकणीवाले अज्ञानी. रोमी कोंकणीवाल्यांच्या मागण्या मान्यच होऊ शकत नाहीत. कोंकणी भाषा परिषद आणि कोंकणी भाषा मंडळ अजून गप्प का? ॲड.उदय भेंब्रेंचे गोमन्तक टिव्हीच्या साश्टेकार कार्यक्रमात 'ब्रम्हास्त्र'.
APAAR कार्ड म्हणजे हा एक नंबर आहे त्यामुळे पालकांनी APAAR करत असताना कुठलीही भीती न बाळगता प्रत्येक विद्यार्थ्यांचे कार्ड केलं पाहिजे. आतापर्यंत 7,800 हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. हे विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. विद्यार्थ्यांचा संपूर्ण डेटा याद्वारे डिजी लॉकरवर लिंक केला जाईल ज्याचा वापर विद्यार्थ्यांना देशात आणि परदेशात कुठेही प्रवेश घेण्यासाठी करता येईल. APAAR अजून अणिवार्य केलेलं नाहीये पण सगळ्या विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे: शैलेश झिंगाडे
गोवा पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि देशातील विशेष दहशतवादविरोधी बल, नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स (NSG) यांनी संयुक्तरित्या गोव्यातील महत्त्वपूर्ण ठिकाणी उच्च दर्जाचे दहशतवादविरोधी सराव घेतले. गोवा राज्य केंद्रीय ग्रंथालय, बोम जिझस बॅसिलिका, सॅ कॅथेड्रल आणि डबलट्री बाय हिल्टन यांसारख्या ठिकाणी 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान या सरावाचे आयोजन करण्यात आले होते.
बार्देश ममलतदार कार्यालयाकडून आलेल्या मागणीनुसार कळंगुटमधील मालमत्ता सर्वे क्र. 205/1 वर असलेल्या बेकायदेशीर बांधकामावर 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता कारवाई केली जाणार आहे. सदर बेकायदेशीर बांधकाम भूपिंदर सिंह आउलख आणि कुलविंदर सिंह आउलख (स्व. सुखदेव सिंह यांचे उत्तराधिकारी) यांच्या मालकीचे आहे. उत्तर गोवा उपविभागीय दंडाधिकारी राजेश एस. आजगावकर यांनी ही कारवाई करण्याचे आदेश दिले असून, या कारवाईसाठी पोलिस संरक्षणासह संपूर्ण पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे.
कळसा-भांडुरा विषयी म्हादई प्राधिकरणाची बैठक पर्वरी कार्यालयात पार पडली. यावेळी कळसा-भांडुरा पाहणी संदर्भात केंद्र सरकारचा सल्ला (Legal Advice) घेण्यात येण्याचे ठरले. या बैठकीत जल संसाधन खात्याचे सचिव आय एस अधिकारी सरप्रितसिंह गील यांच्या ऐवजी आय एस अधिकारी संजित रोड्रिगिस उपस्थिती लावली.
म्हादई संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या प्रवाह प्राधिकरणाची म्हाटसा येथे होणाऱ्या बैठकीस गोव्याचे प्रतिनिधित्व करणारे गोवा जलसंसाधन खात्याचे सचिव आयएस अधिकारी सरप्रितसिंह गिल अनुपस्थित. प्रवाहचे अध्यक्ष गोव्यात आले असता गोव्याचे प्रतिनिधी अनुपस्थित राहणे दुर्दैवी- पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर.
केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आज (25 ऑक्टोबर) गोवा दौऱ्यावर. सावंत सरकारमधील मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी त्यांचे मोपा विमानतळावर स्वागत केले.
अश्विन भोबे यांनी आज (25 ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदाची शपथ घेतली.
काणकोण पोलिसांनी केरी समुद्रकिनाऱ्यावर मनोज कुमार (उत्तराखंड) याला अटक केली. यावेळी त्याच्याकडून 54.5 हजार किमतीचा 109 ग्रॅम गांजा जप्त केला.
मडगाव पोलिसांनी माजी उप चॅरिपर्सन दिपाली सावळ यांचे पती दिगंबर सावळ आणि इतर 5 जणांविरुद्ध कारचे नुकसान करुन ॲड लिओना बरेटो यांना धमकावणे याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.