Goa News Updates: बोगस शैक्षणिक प्रमाणपत्र देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi News Updates: जाणून घ्या गोव्यात घडणाऱ्या ताज्या घडामोडी मराठीमध्ये..
Goa Live Updates: बोगस शैक्षणिक प्रमाणपत्र देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, पणजी, म्हापसा आणि फोंड्यातून चार जण अटकेत
ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

बोगस शैक्षणिक प्रमाणपत्र देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, पणजी, म्हापसा आणि फोंड्यातून चार जण अटकेत

बोगस शैक्षणिक प्रमाणपत्र देणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पणजी, म्हापसा आणि फोंडा येथून चार जणांना अटक करण्यात आली.

गोव्याच्या अमायराची बॅडमिंटन स्पर्धेत शानदार कामगिरी!

अमायरा धुमटकरने 11 वर्षांखालील मुलींच्या एकेरी आणि दुहेरीचे दुहेरी मुकुट जिंकले, तसेच, ऑल गोवा मेजर रँकिंग बॅडमिंटन स्पर्धेत 13 वर्षांखालील मुलींच्या दुहेरी स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले.

पूजा नाईक श्रीपाद नाईक यांचा प्रचार का करत होती?

एका व्हिडीओमध्ये नोकरीच्या घोटाळ्याप्रकरणी रोख रकमेत अटक झालेली पूजा नाईक श्रीपाद नाईक यांच्यासाठी प्रचार करताना दिसत आहे. GPCC उपाध्यक्ष सुनील कवठाणकर यांनी हा व्हिडिओ दाखवला.

कश्यप बखले गोव्याचा शतकवीर; अरुणाचल प्रदेश विरुद्ध दमदार खेळी

पर्वरी येथे खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफी प्लेट डिव्हिजन क्रिकेट सामन्यात गोव्याच्या कश्यप बखलेने अरुणाचल प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात शानदार शतक झळकावले. कश्यपचा हा केवळ दुसरा रणजी सामना आहे.

सरकारला जनतेच्या मताची मुळीच किंमत नाही!! अमित पालेकर

धारगळ येथे होणारा सनबर्न जर का सरकारच्या परवानगीने होत असेल तर याला स्थानिकांकडून विरोध केला जाईल, मात्र जर का सनबर्नला सरकारची परवानगी मिळालेली नसेल तर हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. गोव्यात होणाऱ्या सनबर्नला स्थानिकांकडून विरोध दर्शवला जातोय आणि तरीही जर का सरकार याकडे दुर्लक्ष करत परवानगी देत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं ठरेल असे आप नेते अमित पालेकर यांचे म्हणणे आहे.

सनबर्नला धारगळमधून पुराय विरोध!! आमदार प्रवीण आर्लेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

धारगळ येथे होणाऱ्या सनबर्नला पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी विरोध दर्शवला आहे. यामुळे संस्कृतीला मारा बसेल आणि म्हणूनच स्थानिकांचा देखील सनबर्नला विरोध असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

'व्हडल्या दिवाळे दिसा' बोड्ड्यान पाणी ना!! स्थानिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु

डिचोलीतील बोर्डे परिसरात 'व्हडली दिवाळी'च्या दिवशी नळ कोरडे राहिले आहेत. स्थानिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु झाला असून. जलवाहिनी फुटल्याने मंगळवारी (दि. १२ नोव्हेंबर) दुपारपासून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

वासराला वाचवण्याच्या प्रयत्नात तीन वाहनांचा अपघात, शेवटी वासराचा मृत्यू

पेटके -धारबांदोडा येथे रस्त्यावर असलेल्या वासराला वाचवण्याच्या नादात रिक्षा,जीप व कारने एकमेकांना धडक दिली. या प्रयत्नांना वासराचा देखील मृत्यू झाला.

बायणा किनाऱ्यावर सापडला कारवारमधील व्यक्तीचा मृतदेह

कारवार येथील मेघाचंद्र कुमठेकर या ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह बायणा किनाऱ्यावर सापडला. मिळालेल्या माहितीनुसार मेघाचंद्र गोव्यात मासेमारांच्या बोटीवर काम करायचा.

प्रिया यादवच्या विरोधात आणखीन एका गुन्ह्याची नोंद

प्रिया नाईकने १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अशोक पाणीग्रही (डिचोली) यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आणि याच तक्रारीला अनुसरून डिचोली पोलीसांनी 'भादंसं'च्या ४२० कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com