Goa Updates 11 Feb 2024: राज्यातील दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर

Goa Breaking News 11 Feb 2024: पणजी, म्हापसा, मडगाव, तसेच राज्यातील महत्वाच्या घडामोडी...
Goa Live Updates 11 Feb 2024
Goa Live Updates 11 Feb 2024Dainik Gomantak

वन गावात एका लोकवस्तीजवळ गवताच्या गंजीला आग; सुदैवाने अनर्थ टळला

म्हावळींगे पंचायत क्षेत्रातील वन गावातील एका लोकवस्तीजवळ गवताच्या गंजीला आग. रविवारी दुपारी घडली घटना. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात.

विश्वजीत राणेंच सत्तरीत 'गांव चलो अभियान'!

आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 'गांव चलो अभियाना' अंतर्गत वाळपईतील नागरीकांशी संवाद साधला.यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजना तसेच आरोग्य सुविधा, महिला सशक्तीकरण या मुद्यांवर चर्चा झाली.

सातेरी देवस्थानातील देवाच्या मूर्ती फोडल्याप्रकरणी एकजण ताब्यात

सातेरी देवस्थानातील देवाच्या मूर्ती फोडल्याप्रकरणी कुडचडे पोलिसांनी ॲग्नेल व्हिन्सेंट फर्नांडिस नामक आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे

युवा वर्ग ड्रग्जच्या विळख्यात

राज्यात वाढत्या अपघातांप्रमाणेच ड्रग्ज तस्करीचे प्रमाणही वाढत असून सनबर्न, 31 फर्स्ट सारख्या पार्ट्यांचा आश्रय घेऊन हे तस्कर खुलेमाल तस्करी करताना दिसत आहेत.

मागील 3 वर्षात तर राज्यतील ड्रग्ज तस्करीचे प्रमाण भलतेच वाढले असून ड्रग्ज तस्करीचे गुन्हे आता राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहेत.

या ड्रग्जच्या जाळ्यात युवकांना ओढले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

2020 ते 2023 या चार वर्षांत 563 गुन्हे पोलिस खात्यात नोंद झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

पासपोर्ट सरेंडरच्या वाढत्या प्रकरणांकडे भाजप सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष - एल्टन डिकोस्ता

गोमतकीयांकडून भारतीय पासपोर्ट सरेंडर करण्याच्या वाढत्या आकडेवारीकडे गोव्यातील भाजप सरकारने पूर्णपणे डोळेझाक केल्याचे खरोखरच धक्कादायक आहे.

डॉ.प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, असा गंभीर आरोप केपेचे आमदार एल्टन डिकोस्ता यांनी केला आहे.

सासष्टी- मुरगावात पुढील दोन दिवस पाणी पुरवठा बंद

कार्यकारी अभियंता आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सांगे या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी सासष्टी आणि मुरगाव तालुक्यांतील काही भागांना पुरवठा होणार नाही.

पर्वरी दोन कारमध्ये भीषण अपघात

पर्वरी येथील राष्ट्रीय महामार्गावर दोन कारमध्ये भीषण अपघात. चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारचा समोरून येणाऱ्या कारला धक्का.

अपघातग्रस्त गुरांसाठी बनलेल्या गोठ्याचे उद्घाटन!

नाणूस वाळपई येथील जय श्रीराम गो संवर्धन केंद्राचा अपघातग्रस्त गुरांसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन गोठ्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्या हस्ते उद्घाटन. आज (ता. 11) सप्त गोमाता मंदिराचा पाचवा वर्धापनदिन साजरा.

कुंकळ्ळीतून बेपत्ता झालेली 'ती' भावंडे अखेर सापडली!

कुंकळ्ळी येथून अचानक बेपत्ता झालेली 3 सख्खी भावंडे कळंगुट येथे सापडली आहेत. या मुलांचे वडील मूळ पश्चिम बंगालमधील असून ते इथे कामगार म्हणून काम करतात.

कारच्या धडकेत ओडिशातील एकाचा मृत्यू; ओल्ड गोव्यातील घटना

जुने गोव्यातील कदंब बगल मार्गावर एका कारने रस्त्याने चालत असलेल्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. गोपाळ चंद्रा प्रधान (45, ओडीशा) असे मयताचे नाव आहे. दरम्यान या घटनेतील कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची पुढील चौकशी सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com