बेतुल येथे 6 ते 9 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या भारतीय ऊर्जा सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी 6 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात येणार असून त्यावेळी ते राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (NIT) कॅम्पसचे उद्घाटन करणार आहेत.
कला आणि संस्कृती खात्यातील निधीचा गैरवापर’ हा पक्षांतर्गत मुद्दा असल्याचे बोलल्या बद्दल भाजपचे अध्यक्ष आणि खासदार सदानंद तानावडे यांच्यावर निशाणा साधत, हा निधी त्यांच्या पक्षाचा आहे का, असा सवाल काँग्रेसने शनिवारी केला.
कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी 'विशेष अनुदाना'चा गैरवापर केल्याचा आरोप गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर यांनी केल्यानंतर काँग्रेसने गोविंद गावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
पर्यटनाच्या दृष्टिने गोवा महाग होत चालले आहे. टॅक्सीचे दर वाढले, हॉटेल्सचे रुम भाडे महाग झाले, एअरलायन्सची तिकटं महाग झाली. सगळ्याच बाजूंनी गोवा महाग होत चालला आहे. अशा परिस्थित गोव्यात यायचं की नाही याचा पर्यटक विचार करीत असल्याचे विधान औद्योगिक मंत्री माविन गुदिन्हो याची केलंय.
मंत्री गावडे - सभापती तवडकर यांच्यातला वाद हा आमच्या घरातील संवेदनशील विषय आहे. मी दोघांकडे बोलून मुख्यमंत्र्याकडे चर्चा करणार. मुख्यमंत्री हा विषय सोडवतील. हा विषय बाहेर आला ते चुकीचं झालं. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंची प्रतिक्रिया.
वीज विभागाच्या कंत्राटी कामगारांनी आमदार ॲड. कार्लोस अल्वारेस फेरेरा यांची भेट घेऊन नोकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. हे कामगार 10 वर्षांहून अधिक काळ कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत. आता त्यांचे नोकरीसाठी पात्र वय ओलांडले सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. यावर सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन फरेरा यांनी दिले.
जनसेना प्रमुख जनार्दन भंडारी यांनी KTCL अध्यक्ष उल्हास तुयेकर यांची भेट घेऊन मडगाव-काणकोण-कारवार मार्गावरील बसेस बायपास रोडऐवजी जुन्या मार्गावरून वळवण्याची मागणी केली. याबाबत त्यांनी निवेदन सादर करून 7 दिवसात मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा.
मजुराच्या चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका सुरक्षा रक्षकाने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी प्रकाश कुमार (45, बिहार) याला अटक केली होती. या संशियताला ४ दिवसांची पोलीस कोठडी आज शनिवारी न्यायालयाने सुनावली.
म्हापशातील श्री देव बाडगेश्र्वराला देवस्थान समितीकडून आज शनिवारी हातातील सोन्याचे तसेच पायातील चांदीचे कडे अर्पण. दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी.
भाजपच्या संस्थापक चेहऱ्यांपैकी एक लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक, भारताच्या विकासात ज्यांचे योगदान अतुलनीय आहे, तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशसेवा करण्यापर्यंत ज्यांचा अनमोल जीवनप्रवास आहे, अशा लालकृष्ण अडवाणींना हा सन्मान मिळणे अभिमानाची बाब असल्याचे मोदी म्हणाले.
मडगावात 2 अल्पवयीन मुलांना बेवारस सोडून दिल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित मनू पांडेला ताब्यात घेऊन त्याची पहिली पत्नी निकी पांडे आणि तिचा कथित प्रियकर राजगुरू याला सावंतवाडीतून अटक केली. 27 जानेवारीला यांनी 2 मुलांना मडगावात सोडून दिले होते. मनू पांडेची प्रकृती गंभीर असल्याने त्याला द. गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. निकी पांडेच्या 2 मुलांना सध्या अपना घरमध्ये ठेवण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू.
हाळी चांदेल तिलारी कालव्यामध्ये एक मोठा गवा आणि दोन पिल्ले पडली. दरम्यान वनखात्यातील अधिकारी त्यांना काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
चिवय तुये येथील प्रशांत तीळवे यांच्या घरातील श्वानाला बिबट्याने ठार केले. घराच्या गॅलरीत येऊन बिबट्याने श्वानावर हल्ला केला आणि त्याला मागच्या बाजूला नेले. या घटनेमुळे चिवय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिळगाव येथे मुख्य रस्त्यावर अपघात. खडीवाहू मिनी टेम्पो 'रिव्हर्स'मध्ये दरीत घसरला. मात्र मोठा अनर्थ टळला. अपघातामुळे तासभर वाहतुकीचा खोळंबा.
सभापती आणि भाजपच्या निष्ठावंतांनी कला आणि संस्कृती खात्यातील घोटाळा उघड केला. समोर आलेला प्रकार काही नवीन नाही. ही तर फक्त सुरुवात आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी, अशी माझी मागणी आहे. या घोटाळ्यासोबतच पोलीस, पीडब्ल्यूडी, वीज खाते आणि टीसीपी विभागातील इतर घोटाळ्यांबाबतही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे. आमदार वेंझी व्हिएगस यांचे वक्तव्य
मजुराच्या चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका सुरक्षा रक्षकाने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी प्रकाश कुमार (45, म्हापसा, बिहार) याला अटक करण्यात आली. संशियताविरोधात भदास 363, 376, 354, 354 (अ) , 324 तसेच गोवा बाल कायदा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.