Goa News: "मंत्रीमंडळ फेरबदल, बी.एल. संतोष यांना सगळ्याची पूर्णपणे 'ठाम' कल्पाना दिलीय" दामू नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष

Goa Today's News Update: शिगमोत्सव, होळी, अधिवेशन यासह गोव्यातील कला - क्रीडा, राजकारण, गुन्हे, समाजकारण यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी.
Goa Politics
Damu Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: "मंत्रीमंडळ फेरबदल, बी.एल. संतोष यांना सगळ्याची पूर्णपणे 'ठाम' कल्पाना दिलीय" दामू नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष

मंत्रीमंडळ फेरबदलाचा अधिकार हा सर्वस्वी मुख्यमंत्र्याचा. बी.एल. संतोष यांना जे काही सांगायला पाहिजे ते ठामपणे सांगितले आहे. संघटन आणि सरकार यांच्याबाबतीत त्यांना पूर्ण कल्पना देण्यात आलीय - दामू नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष

Farmers of Sattari Meet CM: जमीन मालकी हक्कासाठी सत्तरीतील शेतकऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Goa Crime: दवर्लीमध्ये दोन तरुणांची लुटमार आणि मारहाण

दवर्लीमधील रेल्वे क्रॉसिंगजवळ तरुणांच्या गटाने दोन तरुणांना बेदम मारहाण केली. हल्लेखोरांनी सोन्याची साखळी आणि अंगठीही हिसकावून घेतली.मायणा -कुडतरी पोलिस स्टेशनमध्ये पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. अद्याप कोणतीही कारवाई न केल्याबद्दल तरुणांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. मायणा -कुडतरी पोलिस स्टेशनशी संपर्क साधला असता पीआय म्हणाले, "आम्ही तपास करत आहोत आणि अद्याप गुन्हा नोंदवलेला नाही."

Goa Politics: सुदीन माझ्या मोठ्या भावासारखे, मला शाळेत पोचविण्यापासून ते...!

Goa Marathi News: "गावाला टेकून मायनिंग डम्प नको" अडवलपालच्या लोकांची भूमिका

गावाला टेकून मायनिंग डम्प नको. अडवलपालच्या लोकांची भूमिका. 'फोमेंतो'च्या खाणीवरील डम्प काम रोखले. गाव संकटात येण्याची लोकांना भीती.

Goa Accident: ताळगावात अपघात! भरधाव दुचाकीची पार्क कारला धडक, चालक जखमी

ताळगावात अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीने पार्क कारला जोराची धडक दिली असून, यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे.

Goa News: शेळवणमध्ये बुडालेला तो स्थानिक अद्याप बेपत्ताच, शोधकार्य सुरु

शेळवणमध्ये बुडालेला तो स्थानिक अद्याप बेपत्ताच असून, अग्निशमन दलाच्या जवानांचे शोधकार्य सुरु आहे. स्थानिक मित्रांसोबत नदीत पोहण्यासाठी गेला होता दरम्यान, तो अचानक बेपत्ता झाला. स्थानिक बुडाल्याचा संशय व्यक्त करण्याता येत असून, अद्याप शोधकार्य सुरु आहे.

Lavoo Mamledar: लवू मामलेदार खून प्रकरण; संशयितला कोर्टाचा दिलासा नाहीच

लवू मामलेदार खून प्रकरणातील संशयित मुजाहीद सनदी याला कोर्टाने जामीन नाकारला आहे. मामलेदार यांच्याशी रिक्षा चालकाचा किरकोळ कारणावरुन वाद झाल्यानंतर लवू यांच्या बेळगावातील खडे बाझार परिसरात मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करुन मुजाहीदला अटक केली आहे.

Goa Drug Case: होळीच्या दिवशी गांजा बाळगल्याप्रकरणी मडगावात तरुणाला अटक

होळीच्या दिवाशी गांजा बाळगल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी रोहीत पांद्रेकर (मालभाट) येथील तरुणाला अटक केली आहे. त्याच्याजवळ एक लाख किंमतीचा १०९० ग्रॅम गांजा आढळून आला आहे.

Goa Crime: दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी; गौरी सावंतला अटक

दीड लाख रुपये किंमतीचे दागिने चोरी केल्याप्रकरणी गौरी सावंत (डोंगरी, तिसवाडी) या महिलेला जुने गोवा पोलिसांनी अटक केली आहे. चोडण येथील तक्रारदाराने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com