Goa News: डिचोली पालिकेला शववाहिका हस्तांतरित

Toady's Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी. राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्वाच्या घडामोडी.
Goa Marathi Breaking News
Goa Marathi Breaking NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News: डिचोली पालिकेला शववाहिका हस्तांतरित

डिचोली पालिकेला शववाहिका. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत खासदार सदानंद शेट तानावडे यांनी शववाहिका केली पालिकेकडे हस्तांतरीत.

Goa Health News: पिळर्ण येथे मेगा मेडिकल कॅम्प...

पिळर्ण येथे शनिवारी मेगा मेडिकल कॅम्पच्या उदघाटनानंतर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पंचायत सभागृहात उभारण्यात आलेल्या ओपीडी कक्षाची पाहणी केली. यावेळी मंत्री राणे यांनी शिबिरात उपस्थित असलेल्या लोकांशी संवाद साधला. तसेच आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गोव्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करण्याच्या उद्देशाने मेगा वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Goa Fire: मिरामारमधील अपार्टमेंटला मोठी आग

व्हीएम साळगावकर कॉलेजजवळील मिरामारमधील अपार्टमेंटला आग लागली. छताचे काम सुरू असताना ही घटना घडली. घटनास्थळी असलेल्या स्विमिंग पूल रसायनांना आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या तैनात करण्यात आल्या. आग आता नियंत्रणात आली आहे.

Goa Crime: केपेमध्ये 2.52 लाख रुपयांचे दागिने चोरीला

एका दागिन्यांच्या दुकानातून तीन महिलांनी २,५२,००० रुपयांचे दागिने चोरले. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. पोलिस तपास सुरू

Goa News: आमठाणे धरणाचे काम पूर्ण होताच एप्रिल महिन्यात बंधाऱ्यातून पाणी सोडणार

आमठाणे धरणाच्या गेटची दुरुस्ती युद्धपातळीवर. काम पूर्ण होताच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत साळ बंधाऱ्यातून धरणात पाणी सोडणार. जलस्रोत खात्याची माहिती.

Karnataka Strike: मराठी-कन्नड भाषा वादाचा गोव्याला फटका; कदंबा परिवहनाचे 2 लाखांचे नुकसान

बेळगावीतील एका बस कंडक्टरला मराठीत न बोलल्यामुळे मारहाण करण्यात आली होती. या घटनेमुळे कर्नाटकात भाषिक वाद पुन्हा एकदा पेटला आहे. या घटनेच्या निषेधार्थ कन्नड समर्थक संघटनांनी शनिवार (२२ मार्च) सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत १२ तासांचा 'कर्नाटक बंद' पुकारला असल्याने राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोव्यातून हुब्बळी, बेळगाव अशा वेगवेगळ्या भागांमध्ये कदंबा बसेस सेवा पुरवतात मात्र कर्नाटक बंद असल्याने कदंबा परिवहनाने ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Goa Politics: गोव्यातील सर्व बिहारींनी डबल इंजिन सरकारला मदत करावी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत

बिहार दिवसाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यातील सर्व बिहारींना गोव्याच्या संस्कृतीचे पालन करण्याचे आवाहन केले. गोव्यातील लोक सर्व धर्म समभाव आहेत. आम्हाला गोव्यात बिहारमधील कोणताही गुन्हेगार नको आहे. यामुळे बिहारचे नाव खराब होईल असं मुख्यमंत्री म्हणाले.

Goa Congress: गोवा प्रदेश काँग्रेस समिती करणार PPP चा निषेध

गोवा प्रदेश काँग्रेस समिती शनिवार २२ मार्च रोजी दुपारी ४:१५ वाजता ताळगाव येथील सरकारी इनडोअर स्टेडियम सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या आधारावर देण्याच्या सरकारच्या अलिकडच्या निर्णयाविरुद्ध निषेध करणार आहे.

Goa News: साखळी नगरपालिकेचा लोगो करा, बक्षीस जिंका

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रीपदाची सहा वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने साखळी नगरपालिकेतर्फे नगरपालिकेचा लोग बनविण्याची अखिल गोवा पातळीवर स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षीस दिले जाणार असून त्याचे बक्षीस वितरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाढदिनी होणार आहे. व प्रथम क्रमांक विजेता लोगो नगरपालिकेवर लावला जाणार आहे, अशी माहिती साखळीच्या नगराध्यक्ष सिध्दी प्रभू यांनी दिली.

Goa Traffic: 22 मार्च 2025 रोजी पणजी येथे शिगमोत्सव परेड निमित्त वाहतूक बदल जारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com