.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पणजी, लोंढा-गोवा दरम्यान असलेल्या रेल्वे मार्गावरील दूधसागर आणि सोनाळीममध्ये शुक्रवारी (ता. २५) मध्यरात्री १२.५५ वाजण्याच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड आणि झाडे कोसळली. नैऋत्य रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने तातडीने दरड हटवण्याचे काम हाती घेतले.
पहाटे ५.३५ वाजता ट्रॅक फिट असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले व वाहतूक पूर्ववत झाली. घटना घडल्यानंतर कॅसलरॉकमधून मदत सामग्री मागविण्यात आली. बचाव पथकासह पुरेसे कर्मचारी होते. दरड कोसळल्यामुळे यशवंत एक्स्प्रेस (क्र. १७३१०) मध्यरात्री १ वाजता सोनाळी येथून कुळे स्टेशनला परतली.
तसेच इतर गाड्यांवर देखील परिणाम झाला. सर्व प्रवाशांसाठी पाणी आणि अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली. या दरम्यान गरज भासल्यास बसेसच्या व्यवस्थेसाठी रेल्वेने परिवहनाशी संपर्क साधला होता. नैऋत्य रेल्वेचे जीएम अरविंद श्रीवास्तव, के. एस. जैन व वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. हुब्बळीचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हर्ष खरे यांनीही घटनास्थळी पोचून पाहणी केली.
अवघ्या चारच तासांमध्ये दूधसागर आणि सोनाळी विभागादरम्यानची दरड साफ करण्यात आली आणि लोंढा-तीनईघाट दरम्यान पडलेली झाड हटवण्यात आले. सकाळी ५.३६ वाजता ट्रॅक फिट असल्याचे प्रमाणित करण्यात आले आणि सामान्य ट्रेनच्या हालचालीसाठी पूर्ववत करण्यात आले आहे. वास्को-तिरुपती एक्स्प्रेस (क्र. १७४१९) लोंढा येथून सकाळी ६ वाजता सुटली आणि वास्को-यशवंतपूर रेल्वे (क्र. १७३०९) अळणावर येथून सकाळी ६.०५ वाजता निघाली.
मागील वर्षी जुलै महिन्यातच शेवटच्या आठवड्यात बेळगाव- गोवा दरम्यानच्या ब्राँगांझा घाटातील दुधसागर जवळील करंझोळजवळ दरड कोसळली होती. कॅसरलॉकपासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तीन क्रमांकाच्या बोगद्याजवळ ही दरड कोसळली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.