kulem: गोव्यात कुळे-मोलेतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी!

kulem: कुळेत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास जलस्रोत खात्याच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
Water Shortage Problem Kulem, Goa
Water Shortage Problem Kulem, GoaDainik Gomantak
Published on
Updated on

kulem: धारबांदोडा तालुक्यातील कुळे-मोले येथील शेतकरी बानाराना-बिंबल येथून कॅनलद्वारे होणारा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने त्रस्त आहेत. पाण्याचा पुरवठा करणारी मुख्य दरवाजातील एकच गेट उघडली आहे व दुसरी गेट गुरुवारपर्यंत उघडावी. अन्यथा जलस्रोत खात्याच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी दिला आहे.

धारबांदोडा तालुक्यातील कुळे-मोले येथील शेतकरी बिंबल-बानाराना येथील कॅनलद्वारे सोडण्यात येत असलेल्या पाण्यावर अवलंबून आहेत. बुधवारी शेतकरी एकत्र येऊन दूधसागर नदीच्या पायथ्याशी असलेल्या मुख्य दरवाजापाशी गेले. तिथे गेल्यानंतर कॅनलच्या मुख्य दरवाजाचे एकच गेट कमी प्रमाणात उघडले आहे व दुसरा दरवाजा उघडलेला नसल्याचे दिसून आले.

Water Shortage Problem Kulem, Goa
Goa: गोव्यातील बेरोजगारीबाबत सरकार उदासीन; सरकारलाच कौशल्य शिक्षणाची गरज, आलेमाव यांची बोचरी टीका

जलस्रोत खात्याने शेतकऱ्यांची एक बैठक शिगाव भागात आयोजित करावी जेणेकरून शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मांडण्यास सोयीस्कर होईल. जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी याची दखल घ्यावी व शेतकऱ्यांना योग्य असा पाण्याचा पुरवठा करण्याचा आदेश खात्याच्या अधिकाऱ्यांना द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

यासंदर्भात जलस्रोत खात्याचे साहाय्यक अभियंता सदानंद नाईक यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून शक्य असल्यास गुरुवारी मुख्य गेटचा दुसरा दरवाजा उघडण्यात येईल.

अजून पाण्यापासून वंचित

‘सरकार सांगते शेती करा व आत्मनिर्भर व्हा’; पण शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन लावलेल्या पिकाला जर योग्य प्रकारे पाणीच मिळत नसेल तर काय फायदा. विविध लागवड करून शेतकऱ्यांना नुकसानीत घालण्याचा तर विचार संबंधित खात्याचा नाही ना? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. नोव्हेंबर महिन्यात सोडलेले पाणी शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळाले नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रकाश देसाई-

एप्रिलमध्ये ओपा प्रकल्पाला पाणी मिळत नसल्याने बंधाऱ्याचे गेट उघडले जातात. मग कॅनलचे पाणी बंद होते. पण येथील शेती काही महिने वाळते. यामुळे शेतकऱ्याला मोठा फटका बसतो. तेव्हा खाणीच्या खंदकातील पाणी जलस्रोत खात्याने पंपद्वारे खेचून कॅनलमध्ये सोडल्यास त्या्चा फायदा शेतकऱ्यांना होईल.

शशिकांत वेळीप, शेतकरी-

पाण्याची कमतरता जाणवू लागल्याने आम्ही पारंपरिक शेती सोडून ऊस लागवडीकडे वळलो. पण फॅक्टरीच्या बेभरंवशामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात हळदीचे पीक घेतले आहे. तसेच बागायतीत सुपारीचेही पीक घेतो. कॅनलमधून पाणी सोडावे. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा पूर्ण फायदा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com