Inter-Divisional Senior Women's T-20 Cricket Tournament: दक्षिण विभाग संघाच्या कर्णधार पदाची धुरा शिखा पांडेकडे

Inter-Divisional Senior Women's T-20 Cricket Tournament पूर्वजा वेर्लेकरचीही निवड- निमंत्रक रोहन गावस देसाई यांच्याकडून अभिनंदन
Shikha Pandey, Poorvaja Verlekar
Shikha Pandey, Poorvaja VerlekarDainik Gomantak
Published on
Updated on

Inter-Divisional Senior Women's T-20 Cricket Tournament दक्षिण विभाग क्रिकेट संघ निवडीत पुन्हा एकदा गोव्याला मानाचे स्थान मिळाले आहे. आगामी आंतरविभागीय सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत आंतरराष्ट्रीय अष्टपैलू शिखा पांडे दक्षिण विभागाचे नेतृत्व करेल, तसेच सलामीची पूर्वजा वेर्लेकर हिचीही संघात निवड झाली आहे.

गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव रोहन गावस देसाई यंदा दक्षिण विभाग निवड समितीचे निमंत्रक आहेत. निवड समितीची बैठक पर्वरी येथे झाली. आंतरविभागीय स्पर्धा 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत लखनौ येथे खेळली जाईल.

Shikha Pandey, Poorvaja Verlekar
दक्षिणेतून गोव्यात येणारी 'भारत गौरव' ट्रेन 07 डिसेंबरपासून सुरु होणार, मार्गात अनेक पर्यटन स्थळांचा समावेश

दक्षिण विभाग संघात गोमंतकीयांना संधी मिळत आहे ही राज्य क्रिकेटसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे रोहन यांनी सांगितले. निवड झालेले खेळाडू, तसेच सपोर्ट स्टाफचे त्यांनी अभिनंदन केले.

दक्षिण विभाग संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गोव्याचे महिला क्रिकेट संचालक सर्वेश नाईक यांची नियुक्ती झाली, तर रिया चिनळकर संघाच्या व्हिडिओ ॲनालिस्ट असतील. गोव्याची आणखी एक खेळाडू तरन्नुम पठाण हिची राखीव खेळाडूंत निवड झाली आहे.

गतमहिन्यात नागपूर येथे झालेल्या सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत शिखा हिने सहा सामन्यांत एका अर्धशतकासह 99 धावा व 8 विकेट अशी अष्टपैलू कामगिरी बजावली होती. पूर्वजाने सहा डावात 105 धावा केल्या, तर तरन्नुम हिने 99 धावा केल्या, तसेच 5 गडी बाद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com