Bharat Gaurav tourist train to Goa: मुकांबिका मंदिर आणि दक्षिण कॅनरा मार्गे सेनकोट्टाई, शिवकाशी, मदुराई, दिंडीगुल ते गोवा पर्यटक ट्रेन धावणार आहे. 07 डिसेंबरपासून ही पर्यटक 'भारत गौरव' ट्रेन धावणार आहे
ट्रेन मार्गात उडुपी, मुकांबिका मंदिर, मुर्डेश्वर मंदिर, शृंगेरी (शारदा मंदिर), होरानाडू (अन्नपूर्णेश्वरी मंदिर) आणि गोव्याचे समुद्रकिनारे यांचा समावेश असेल, असे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तिरुअनंतपुरमजवळील कोचुवेली येथून ही पर्यटक ट्रेन सुटेल पुढे सेनकोट्टई येथे पहाटे 3.35 वाजता, टेंकासी येथे पहाटे 3.50 वाजता, राजापलायम येथे पहाटे 5.20 वाजता, शिवकाशी येथे पहाटे 5.55 वाजता, विरुधुनगर येथे पहाटे 6.30 वाजता आणि दिंडीगुल मध्ये 4.30 वाजता पोहचेल.
ट्रेन तिरुची, चिदंबरम, चेन्नई एग्मोर, सेलम, पोदानूर (कोइम्बतूर दक्षिण), पलक्कड मार्गे 8 डिसेंबर रोजी मडगाव (गोवा) येथे संध्याकाळी 7.30 वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात 0 डिसेंबरला ट्रेन मडगावहून संध्याकाळी 07 वाजता निघेल आणि 12 डिसेंबरला 12.05 वाजता सेनकोट्टाईला पोहोचेल.
ट्रेनमध्ये तीन एसी थ्री-टायर कोच, आठ स्लीपर क्लास कोच, एक पॅन्ट्री कार आणि दोन पॉवर कार असतील.
पर्यटक ट्रेनबाबत 82879 31977 किंवा 82879 32122 या मोबाईल नंबरवर अधिक माहिती मिळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.