Mapusa: भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामामुळे म्हापशात रस्त्यांची दुरावस्था; वाहनचालकांना करावी लागतेय तारेवरची कसरत!

Mapusa Roads: म्हापसा येथे भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामामुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
Mapusa: भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामामुळे म्हापशात रस्त्यांची दुरावस्था; वाहनचालकांना करावी लागतेय तारेवरची कसरत!
Mapusa RoadsDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा येथे भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामामुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुळात वीज खात्याला म्हापसा पालिकेने हे काम पूर्ण होताच, रस्ते पूर्ववत करावे, या अटीवर खोदकामासाठी एनओसी देण्याचा ठराव घेतला होता. परंतु, आता महिने उलटले तरी रस्ते पूर्ववत झालेले नाहीत. गणेशोत्सव दारात येऊनही रस्ते दुरुस्तीला मुहूर्त मिळत नसल्याने बहुतांश नगरसेवकांनी शुक्रवारी, गणेश चतुर्थीच्या तयारीनिमित्त झालेल्या पालिका मंडळाच्या विशेष बैठकीत, नगराध्यक्षांना धारेवर धरले. यावर नगराध्यक्षांकडे समर्पक उत्तरे नव्हती.

याविषयी स्पष्टीकरण देताना नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर म्हणाल्या, सध्या रस्ते दुरुस्तीच्या डागडुजीचे काम हाती घेतले असून, लोकांना त्रास होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुळात खराब रस्त्यांसाठी फक्त पालिकेलाच दोषी धरता येणार नाही. इतर अंतर्गत प्रशासकीय विभाग असून पालिका या विभागांशी सातत्याने पाठपुरावा करत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. परंतु पालिकेचे हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे सांगत नगरसेवकांनी नगराध्यक्षांना सुनावले.

नगरसेवक अ‍ॅड. शंशाक नार्वेकर म्हणाले, मुळात पालिकेने वीज विभागाला शहरातील रस्ते खोदण्यासाठी एनओसी दिली होती, त्यासाठी रस्ते काम पूर्ण होताच लागलीच पूर्ववत केले जातील अशी अट होती. आता इतके महिने उलटले, तरीही लोकांना त्रास सहन करावा लागतोय. नगरसेवक प्रकाश भिवशेट म्हणाले, गणेशोत्सव दारात येऊनही कोणताही रस्ता दुरुस्तीला मुहूर्त झाला नसल्याने असंतोष व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com