Goa Marathi Academy गोवा मराठी अकादमी पुरस्कृत मराठी तालुका प्रभाग सत्तरीतर्फे मराठी सांस्कृतिक केंद्र होंडाच्या सहकार्याने रविवार दि. 17 डिसेंबर रोजी आजोबानगर होंडा येथे मराठी साहित्य व सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन केले आहे.
गोवा मराठी अकादमी सत्तरी तालुका समन्वयक व गोवा मराठी अकादमी सदस्य आनंद जगन्नाथ मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली या संमेलनासाठी कार्याध्यक्ष म्हणून राघोबा परब तर सचिव म्हणून जयसिंग पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
सत्तरी तालुका समितीने यापूर्वी ठाणे, नगरगांव, मोर्ले, पाली, केरी अशा सत्तरी तालुक्यातील विविध ठिकाणी सांस्कृतिक संमेलन आयोजित केलेली आहेत तर यावर्षी होंडा येथे घेण्याचे ठरविले आहे.
या संमेलनाविषयी सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच विविध समित्या व उप-समित्यांची ही स्थापना करण्यात आली आहे. संमेलनात ग्रंथदिंडी पासून संमेलनाची सुरुवात करण्यात येणार आहे.
तसेच उद्घाटनांनंतर विविध असे सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत, कवी संमेलन, पत्रकारीता, प्रश्नमंजुषा, परिसंवाद व गौरव अशा विविध विषयांशी निगडित भाषा, साहित्य व संस्कृती संवर्धनाच्या पार्श्वभूमीवरील घटकांचा संमेलनात सहभाग असणार आहे अशी चर्चा करण्यात या प्राथमिक सभेत करण्यात आली.
सभेत सविस्तर चर्चा करण्यात आल्यानंतर या संमेलनाची दुसरी सभा आजोबा देवस्थान या ठिकाणी मंगळवारी 28 नोव्हेंबर रोजी संध्या. 7 वाजता घेण्यात येणार आहे असे ठरले.
या संमेलनाच्या आयोजनासाठी सत्तरी तालुक्यातील मराठीप्रेमी, साहित्यिक, लेखक नाटककार,लोककलाकार, तसेच संगीतकार यांनी या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन गोवा मराठी अकादमी पुरस्कृत सत्तरी तालुका प्रभाग समिती सचिव रामकृष्ण विठ्ठल गावस यांनी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.