Goa: राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढले

रक्तदाबाला बळी पडला आहे. एलएएसआयच्या अहवालानुसार गोव्यात उच्च रक्तदाबाचे प्रमाण ४६.१ टक्के आहे. उच्च रक्तदाब हा प्राणघातक कोविड १९ महामारीत एक प्रमुख जोखीम घटक म्हणून ओळखला गेला आहे.
ज्येष्ठ लोकांमध्येच नाही, तर ४५ वर्षांवरील नागरिकांतही उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे.
ज्येष्ठ लोकांमध्येच नाही, तर ४५ वर्षांवरील नागरिकांतही उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे.Dainik Gomantak

पणजी: राज्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये (Among citizens above 45 years) अनियंत्रित उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत (Increasing the rate of high blood pressure) आहे. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीने (BHU) प्रकाशित केलेल्या अहवालानुसार केवळ ज्येष्ठ लोकांमध्येच नाही, तर ४५ वर्षांवरील नागरिकांतही उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे.

ज्येष्ठ लोकांमध्येच नाही, तर ४५ वर्षांवरील नागरिकांतही उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे.
Goa: राज्यात डेंग्यूचा धोका वाढला!

आयएमएस, बीएचयू आणि ग्रीड कौन्सिलच्या कम्युनिटी मेडिसीन विभागाने केलेल्या पाहणीत ४५ पेक्षा जास्त वयाच्या ४५ टक्के भारतीयांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. बीएचयू आणि ग्रीड कौन्सिलच्या कम्युनिटी मेडिसीन विभागाने आपल्या अहवालात देशातील वृद्ध लोकसंख्येतील उच्च रक्तदाबाचे ओझे आणि नियंत्रण दराचे विश्लेषण केले आहे. या संशोधनाच्या अहवालाचे प्रकाशन नुकतेच झाले. याप्रसंगी बोलताना आयएमएस, बीएचयूचे संचालक प्रो. बी. आर. मित्तल म्हणाले, की उच्च रक्तदाब हा सर्वांत प्रमुख धोका असून हृदयविकाराचा धक्का, स्ट्रोक आणि मूत्रपिंडाच्या आजाराचे घटक कमी निदान आणि उपचारांखाली राहतात.

ज्येष्ठ लोकांमध्येच नाही, तर ४५ वर्षांवरील नागरिकांतही उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे.
'या' दोन राज्यात वाढत आहे कर्करोग, IMCR-NCDIR च्या अहवालात धक्कादायक खुलासा

प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट आणि ‘नोट’चे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांच्या मते हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग (सीव्हीडी), प्रामुख्याने इस्केमिक हृदयरोग आणि स्ट्रोक हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. यामुळे दरवर्षी १७.७ दशलक्ष मृत्यू होतात. डब्ल्यूएचओच्या अंदाजनुसार, अशाप्रकारच्या मृत्यूंमध्ये भारताचा पाचवा क्रमांक आहे. उच्च रक्तदाब हा प्राणघातक कोविड १९ महामारीत एक प्रमुख जोखीम घटक म्हणून ओळखला गेला आहे.

गोवाही उच्च

रक्तदाबाला बळी पडला आहे. एलएएसआयच्या अहवालानुसार गोव्यात उच्च रक्तदाबाचे प्रमाण ४६.१ टक्के आहे. जोपर्यंत गांभीर्याने उपचार केले जात नाहीत, तोपर्यंत येत्या काही वर्षांमध्ये रोगाचा भार आणखी वाढण्याची शक्यता आहे.

डॉ. शेखर साळकर, ‘नोट’चे अध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com