चिंताजनक! मधुमेहाचा विळखा वाढतोय; दोन वर्षातली नव्या रुग्णांची आकडेवारी समोर

महिलांची संख्या वाढली : विधानसभेत आरोग्यमंत्र्यांच्या लेखी उत्तरातून माहिती
Increase in Diabetic Patients
Increase in Diabetic PatientsDainik Gomantak
Published on
Updated on

Increase in Diabetic Patients राज्यात दरवर्षी मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ सुरू असून गेल्या दोन वर्षांत मधुमेहाचे १६,८७३ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये पुरुषांपेक्षा महिला रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. गेल्यावर्षीपेक्षा ही वाढ ३० टक्के असल्याने ही चिंतेची बाब आहे.

२०२१-२२ यावर्षी ७,१७५ नवे रुग्ण आढळून आले होते तर २०२२-२३ या काळात ९,६९८ रुग्ण सापडले आहेत. विधानसभेत आमदार प्रवीण आर्लेकर यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्‍नावर आरोग्यमंत्र्यांनी लेखी उत्तरातून ही माहिती दिली आहे.

मधुमेहाचे प्रमाण हे वयोगट ३० ते ६० तसेच ६० ते ८० यामधील रुग्णांमध्ये अधिक दिसून येत आहे. या रुग्णांमध्ये वेळेवर न होणारे जेवळ तसेच वृद्धापकाळातील इतर व्याधी यामुळेही मधुमेहाचे प्रमाण वाढते. ३० ते ८० वयोगटातील मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढलेले आहे हे आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरावरून दिसून येत आहे.

Increase in Diabetic Patients
Yuri Alemao: खाणींबाबत सरकारची केवळ आश्‍वासनंच! निदान आमच्या काळात तरी...

बदलती जीवनशैली कारणीभूत

मधुमेहाचे प्रमाण वाढण्यास कारण गोमंतकीय जनतेची जीवनशैली दिवसेंदिवस बदलत चालली आहे. तसेच त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊ लागला आहे.

फास्टफूडवर अधिक भर दिला जात आहे, त्यामुळे या आहारातून लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, डिसलीपीडेमिया यांसारखे आजार दिवसेंदिवस वाढत असून मधुमेहाची लागण होत आहे, असे उत्तरात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com