Goa Health Budget : आरोग्य क्षेत्रासाठी २ हजार १२१.८६ कोटी

Goa Health Budget : या वर्षाच्या अखेरीपर्यंत मानसिक रुग्णांसाठी डे-केअर सेंटर सुरू करणार.
Goa Health Budget  2024
Goa Health Budget 2024 Dainik Gomantak

Goa Health Budget : गोमेकॉसाठी ८९०.२५ कोटी रुपयांचा महसुली आणि १८१.१० कोटी रुपयांचा भांडवली मिळून १ हजार ७१.३५ कोटी रुपयांचा खर्च होणार.

हृदयविकार विभागात महाधमणी स्टेनोसिस रुग्णांसाठी ट्रान्स कॅथेटर महाधमणी झडप अंमलबजावणी सुरू करणार.

कौशल्य विकासावर ३.१० कोटी रुपये खर्च करणार.

आरोग्य सेवा संचालनालयासाठी ८३८.४७ कोटी रुपयांची तरतूद.

दक्षिण गोव्यातील ५० खाटांचे आयुष एकात्मिक इस्पितळ या वर्षात पूर्ण करणार.

बेतकी, कांदाेळी, कुडतरी, पर्वरी, मुरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रिवण येथील ग्रामीण वैद्यकीय दवाखाना यांवर ५५.५० कोटींचा भांडवली खर्च होणार.

दंतवैद्यकीय महाविद्यालयासाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद.

Goa Health Budget  2024
Major Announcement In Goa Budget: गोवा अर्थसंकल्पातील मोठ्या आणि महत्वाच्या घोषणा

दंतवैद्यकीय महाविद्यालयात बाह्यरुग्ण विभाग डिजिटल होणार.

दंतचिकित्सेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणार.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी १५.४८ कोटी रुपये खर्चून वसतिगृह.

मानसोपचार इस्पितळासाठी ८२ कोटींची तरतूद.

या वर्षात १०० खाटांचा नवीन विभाग सुरू करणार.

ज्येष्ठ नागरिक, बालक यांच्यासाठी अतिदक्षता विभाग आणि कैद्यांसाठी वेगळा विभाग सुरू करणार.

या वर्षाच्या अखेरीपर्यंत मानसिक रुग्णांसाठी डे-केअर सेंटर सुरू करणार.

त्यांना योग, सुतारकाम, बेकरी, फुले तयार करणे, छापणे, हस्तकला, भरतकाम, मेणबत्त्या करणे अशी कौशल्ये शिकविली जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com