Goa H3N2 Update: गोव्यात H3N2चे रुग्ण वाढताहेत! मुख्यमंत्र्यांनी दिल्या 'या' सूचना

सध्‍या देशभर थैमान घातलेल्या H3N2 चे दोन रुग्ण राज्यात सापडले आहेत.
CM Pramod Sawant | Goa H3N2 Update
CM Pramod Sawant | Goa H3N2 UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa H3N2 Update: सध्‍या देशभर थैमान घातलेल्या H3N2 चे दोन रुग्ण राज्यात सापडले आहेत. त्याचबरोबरच कोरोनाबाधितांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य प्रशासनाने सतर्कतेचे उपाय म्हणून नवीन आदर्श कार्यप्रणाली जाहीर केली आहे.

CM Pramod Sawant | Goa H3N2 Update
Mandre News: महिलांचे तडफदार पोवाडा गायन

याबाबत मुख्यमंत्र्यांनी विधान केले आहे. ते म्हणाले की, 'राज्यात H3N2 चे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्हाला कोरोनाची लक्षणे दिसली तर ताबडतोब चाचणी करून घेऊन विलगीकरणात रहा. याबाबत लवकरच केंद्राने जाहीर केलेली ॲडव्हायजरी गोव्यातही लागू करण्यात येईल.'

दरम्यान, काल नव्याने 17 कोरोनाचे रुग्‍ण सापडले. त्‍यातील 11 जण मडगावातील आहेत. कोरोनाची बाधा झाल्याने एकूण रुग्‍णांची संख्या 109वर पोचली आहे.

दरम्‍यान, राज्यातील रुग्णांमध्ये ‘एच3-एन2’ लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसत होती. म्हणून या नव्या विषाणूची लागण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी काही नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविले होते. यापैकी दोन बाधित रुग्ण सापडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com