Vijay Bhike: बांबोळी येथील रोजगार मेळाव्याची अधिकृत आकडेवारी द्या

Vijay Bhike: काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली कामगार आयुक्तांची भेट
Vijay Bhike |Goa News
Vijay Bhike |Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Vijay Bhike: बांबोळी येथे नुकत्याच झालेल्या रोजगार मेळाव्याबाबत राज्य सरकारला प्रश्न विचारत उत्तर गोव्यातील काँग्रेसचे नेते विजय भिके यांनी सांगितले, की चार हजार नोकऱ्यांची जाहिरात करणाऱ्या सरकारने राज्यातील तरुण-तरुणींची चेष्टा केली आहे. सरकारने या मेळाव्यातील अधिकृत आकडेवारी जाहीर करावी.

एल्विस गोम्स, जॉन नाझरेथ, महेश म्हांबरे, अहराज मुल्ला, मनोज पालकर, पंच सदस्य सिरिडाओ यांच्यासह काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने कामगार आयुक्त राजू गावस यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.

सुरुवातीला 15 हजार अर्जदारांची या मेळाव्यासाठी नोंद झाली होती, नंतर हा आकडा 18 हजारवर पोहोचला. आम्ही कामगार आयुक्तांना रोजगार मेळाव्याची आकडेवारी सार्वजनिक करण्यास सांगितली आहे.

केंद्र आणि राज्य या आधीच्या सरकारांनी 10 कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, असे सांगून भिके म्हणाले की, बेरोजगारीचा सामना करण्यासाठी सरकार गंभीर नाही. नोटाबंदीपासून देशात 20 कोटी लोक बेरोजगार झाले आहेत.

Vijay Bhike |Goa News
IFFI Goa 2022: 53 व्या इफ्फीचे थाटात उद्घाटन; सौरांना जीवनगौरव तर चिरंजीवी 'Personality of The Year'

आमचे तरुण जेव्हा नोकरी मिळवण्याच्या मागे लागतात, तेव्हा त्यांची आपले घर चालवण्यासाठीची धडपड असते. पालक आपल्या मुलांसाठी शैक्षणिक कर्जासाठी खूप पैसा खर्च करतात. शिक्षण पूर्ण झालेल्यांना नोकरी देणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com