CM Pramod Sawant: गोव्यात लवकरच 'बीएससी इन फिशरीज' अभ्यासक्रम; विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार

CM Pramod Sawant: गोव्याचा हा व्यवसाय पारंपरिक असून या व्यवसायांमध्ये गोमंतकीयांचा सहभाग असणे आवश्यक आहे
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

राज्यातील पारंपरिक मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी गोव्यात आजपासून (दि. 23 जानेवारी) मेगा फिश फेस्टिव्हलला प्रारंभ करण्यात आलाय.

या फेस्टिव्हलच्या माध्यमातून या व्यवसायाशी निगडीत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्यात येते.

याच विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी या फेस्टिवलमध्ये बीएससी इन फिशरीज हा नवीन अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची माहिती दिलीय.

मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी आणि या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकारने मत्स्यविज्ञान बॅचलर ऑफ फिशरीज प्रोग्राममध्ये केवळ गोव्याच्या विद्यार्थ्यांसाठी तीन जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली असून या विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च सरकार करेल अशी माहिती सावंत यांनी यावेळी दिली.

मासळी नसेल तर गोमंतकियांचे जेवण अपूर्ण असते असे म्हटले जाते आणि ते काही प्रमाणात खरेही आहे. मात्र सध्या या व्यवसायासाठी गोव्यातील कामगार मिळत नसल्याने या मच्छीमारी व्यवसायासाठी परप्रांतीय कामगार बोलावले लागतात.

CM Pramod Sawant
Aqua Goa Mega Fish Festival: फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पणजीत फिश फेस्टिव्हल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रचार गाड्यांना हिरवा झेंडा

मत्स्यव्यवसायांमध्ये गोमंतकीयांचा सहभाग हवा- सावंत

त्यामुळे सध्या तरी गोव्यात व्यवसायासाठी बहुतांशी कामगार परराज्यातील असल्याचे दिसून येतात. गोव्याचा हा पारंपरिक व्यवसाय असून या व्यवसायांमध्ये गोमंतकीयांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे, यासाठीच सरकारने अशाप्रकारे कॉलेज शिक्षणातून प्रयत्न सुरू केले आहेत.

या व्यवसायातून महिन्याकाठी लाखोंची उलाढाल होत असून या व्यवसायातील इत्यंभूत माहिती युवा वर्गाला मिळावी, यासाठी बीएस्सी (मासेमारी) अभ्यासक्रम सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मत्स्यव्यवसाय केवळ समुद्रापुरता मर्यादित नाही- हळर्णकर

गोव्याच्या किनारपट्टीवर जसा पर्यटन व्यवसाय बहरतो तसाच गोव्याचा पारंपरिक मत्स्य व्यवसायही चालतो. गोव्यातून मोठ्या प्रमाणावर माशांची निर्यात आणि आयात केली जाते.

त्यामुळेच गोव्यातील तरुणांनी या उद्योगाकडे त्यांचे करिअर म्हणून विचार करणं आवश्यक आहे. जेव्हा मासेमारीचा विषय निघतो, तेव्हा लोक अनेकदा समुद्रातील मासेमारी एवढाच दृष्टिकोन बाळगतात.

मात्र, मत्स्यव्यवसाय हा केवळ समुद्रापुरता मर्यादित नसून, मत्स्यपालन करूनही मासेमारी करता येते.

या पद्धतीचा प्रचार करण्यासाठी सरकारने विविध योजना आणल्या असून त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवश्यक ते ज्ञान मिळवता येऊ शकते असे मत्स्यव्यवसाय मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com