Goa Taxi: गोयचो टॅक्सी पात्राव योजनेतून पेडणेतील 55 लाभार्थ्यांना टॅक्सी; महिलाही झाल्या टॅक्सीमालक

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते योजनेचा प्रारंभ
Goa Taxi
Goa Taxi Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Taxi: गोयचो टॅक्सी पात्राव योजनेतून 55 लाभार्थ्यांना टॅक्सी सुपुर्द करण्यात आली. या योजनेचा प्रारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केला. या योजनेअंतर्गत महिला देखील टॅक्सी पात्राव झाल्याचा आनंद होत आहे. यासाठी गोवा माईल्सचे अभिनंदन. महिलांनाही स्वयंपूर्ण करणारी ही योजना आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Goa Taxi
Goa Taxi: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'या' तारखेपर्यंत ब्लू कॅबसाठी काऊंटर सुरू होणार

टॅक्सी दिलेल्या 55 पैकी 12 जणांच्या घरात सायकलदेखील नाही. ते टॅक्सीचालकही नाहीत. पण ते आज टॅक्सीचे मालक झाले आहेत. एक पैसा न देता टॅक्सी मिळणार असल्याने याचा लाभ घ्या. सुरवातीला पेडणेतील नागरिकांना प्राधान्य दिले आहे.

गोयचो टॅक्सी पात्राव योजने म्हणजे गोवा वाहतूक उद्योजक योजना असून गोवा माईल्स आणि वाहतूक खात्याच्या संयुक्त विद्यमाने ही सुरू केली गेली आहे. याद्वारे ग्रामीण भागातील ज्यांना टॅक्सी व्यवसायात यायचे आहे त्यांना टॅक्सीसाठी डाऊन पेमेंट म्हणून एक लाख रुपये निधी मिळेल.

त्या पुढील हप्ते लाभार्थीला भरावे लागतील. या टॅक्सी थेट गोवा माईल्सच्या ॲपवर चालतील. या योजनेतून किमान एक हजार टॅक्सी देण्याचे लक्ष्य आहे. या टॅक्सी या सीएनजीवर चालणार असल्याने त्या पर्यावरणपूरक असतील. त्यासाठी सीएनजी आणि ई-चार्जिंग सुविधा करण्यात येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com