180 दिवसांत नेहरु स्टेडीयम उभारणारे गोव्याचे माजी क्रीडा मंत्री मोंत क्रुझ यांचे निधन, राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त

Fransisco Monte Cruz Passed Away: मोंत क्रुझ यांचे योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाई, मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली.
Fransisco Monte Cruz : 180 दिवसांत नेहरु स्टेडीयमची उभारणारे गोव्याचे माजी क्रीडा मंत्री मोंत क्रुझ यांचे निधन, CM कडून श्रद्धांजली
Fransisco Monte Cruz Passed AwayDainik Gomantak
Published on
Updated on

Fransisco Monte Cruz Passed Away

बाणावलीचे माजी आमदार आणि माजी क्रीडा मंत्री फ्रान्सिस मोंत क्रुझ यांचे निधन झाले आहे. क्रुझ यांनी आज पहाटे (मंगळवारी, दि.२७) वयाच्या ७९ वर्षी अखेरचा श्वास घेतला.

क्रीडा मंत्री असताना क्रुझ यांनी विक्रमी १८० दिवसात फातोर्डा नेहरु स्टेडीयमची उभारणी केली होती.

क्रुझ यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. माजी मंत्री क्रुझ यांच्या निधनाचे वृत्त ऐकूण दु:ख झाले. राज्यासाठी त्यांनी दिलेले योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल, अशा शब्दात मुख्यमंत्री सावंत यांनी श्रद्धाजंली दिली.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मोंत क्रुझ यांना आदरांजली अर्पण केली. मोंत क्रुझ यांनी नेहमीचे नवे बेंचमार्क स्थापित केले. त्यांचे निधन राज्याचे नुकसान आहे. त्यांचे राजकीर जीवन आणि उद्योगातील रेकॉर्ड्स उत्तुंग आहेत. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, अशा शब्दात आलेमाव यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी देखील मोंत क्रुझ यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Fransisco Monte Cruz : 180 दिवसांत नेहरु स्टेडीयमची उभारणारे गोव्याचे माजी क्रीडा मंत्री मोंत क्रुझ यांचे निधन, CM कडून श्रद्धांजली
Amit Palekar: अटक टाळण्यासाठी आप नेते अमित पालेकरांची धडपड, उच्च न्यायालयात घेतली धाव

फ्रान्सिस मोंत क्रुझ क्रीडा मंत्री असताना विक्रमी १८० दिवसांत त्यांनी फातोर्डा येथील नेहरु स्टेडीयमची उभारणी केली होती. १९८९ साली राज्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील फूटबॉल स्पर्धा या मैदानावर पार पडली होती. बाणावली मतदारसंघाचे नेतृत्व करणारे मोंत क्रुझ यांचे कार्य नेहमीच लक्षात ठेवले जाईल, अशी भावना राजकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com