Flight Tickets : गोव्याला येण्यासाठी विमान तिकिटे महागली

Flights Tickets : याच कालावधीमध्ये विमान प्रवास, बस प्रवास तसेच हॉटेलच्या दरांमध्ये सुद्धा वाढ होते.
flight
flightDainik Gomantak
Published on
Updated on

Flight Tickets : पणजी, ख्रिसमस, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशातील पर्यटक दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये गोव्यात मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. याच कालावधीमध्ये विमान प्रवास, बस प्रवास तसेच हॉटेलच्या दरांमध्ये सुद्धा वाढ होते.

गेल्या वर्षीदेखील विमान तिकिटांमध्ये वाढ झाली होती आणि उपलब्ध माहितीनुसार यंदाचा विमान प्रवास १७ टक्क्यांनी महागला आहे.

दुसरीकडे देशांतर्गत विमान प्रवास स्वस्त झाला आहे. विमान कंपन्यांनी दिल्ली ते मुंबई, मुंबई ते बेंगळूरू तसेच मुंबई ते चेन्नईच्या तिकीट दरात २४ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीमध्ये २८ टक्क्यांपर्यंत घट केली आहे.

मात्र दिल्ली-बेंगळूरू, दिल्ली-श्रीनगर सोबतच गोव्याचा विमान प्रवास महागला आहे.असे आहेत विमान तिकिटांचे दर (२४ डिसेंबर ते ०१ जानेवारी)

या मार्गावरील प्रवास तिकिटात वाढ

मार्ग २०२२ २०२३ वाढ

दिल्ली ते गोवा ६९५० ८१०० +१७.०१ %

मुंबई ते गोवा ४०८० ४५८० +१२.०३ %

दिल्ली ते बेंगळूरू ७६०२ ७८२३ +०२.९१ %

दिल्ली ते श्रीनगर ५९६३ ६०६२ +०१.६६ %

या मार्गावरील प्रवास तिकिटात घट

मार्ग २०२२ २०२३ घट

मुंबई ते चेन्नई ५४३१ ३८८९ -२८.०४ %

मुंबई ते बेंगळूरू ६१३३ ४६६२ -२३.०९ %

मुंबई ते डेहराडून ८२५० ७२६२ -११.९८ %

दिल्ली ते हैदराबाद ६६४२ ५८७८ -११.५६ %

दिल्ली ते मुंबई ५७२ ५६०८ -०२.०८ %

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com