Seafood Safety: "गोव्‍यात येणारी मासळी सुरक्षितच, दर्जा तपासण्‍यासाठी 24 तास यंत्रणा कार्यान्वित", आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणेंची माहिती

Goa Fish Saftey: गोमंतकीय जनतेला सुरक्षित व आरोग्यदायी अन्न मिळावे यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्‍याचाच एक भाग म्हणून २०१९ पासून मासळीचा दर्जा तपासण्‍यासाठी २४ तास यंत्रणा कार्यान्वित करण्‍यात आली आहे.
Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोमंतकीय जनतेला सुरक्षित व आरोग्यदायी अन्न मिळावे यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्‍याचाच एक भाग म्हणून २०१९ पासून मासळीचा दर्जा तपासण्‍यासाठी २४ तास यंत्रणा कार्यान्वित करण्‍यात आली आहे. कोणत्याही नमुन्यात फॉर्मेलीन आढळलेले नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी दिली.

गोवा सरकारने क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (क्युसीआय) या केंद्रीय संस्थेशी भागीदारी करून मासळीतील रसायनांची तपासणी करण्याची सेवा सुरू केली आहे.

याअंतर्गत पोळे, पत्रादेवी आणि मडगाव घाऊक मासळी बाजारात २४ तास तपासणी केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांमार्फत राज्यात येणाऱ्या प्रत्येक मासळीवाहू वाहनाची आणि मडगाव बाजारातील मासळीची तपासणी केली जाते, असे राणे यांनी सांगितले.

Vishwajit Rane
Goa Crime: 'त्या' पित्‍याने चोरला ॲसिडचा कॅन! मुलीचे होते ऋषभवर एकतर्फी प्रेम, तपासातून अनेक बाबी समोर

एफडीएच्या संचालक श्‍‍वेता देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण २ लाख ५११ पैकी कोणत्याही नमुन्यात फॉर्मेलीन किंवा त्‍याचे अंश आढळलेले नाहीत. एफडीएकडून नियमित मासळीचे नमुने घेतले जातात.

Vishwajit Rane
ED Raid Goa: गोव्यात ईडीची मोठी कारवाई; इस्टिव्हन डिसोझा यांची 60 कोटींची मालमत्ता जप्त

मार्च ते जूनपर्यंत (२०२५) तपासलेले नमुने

  उत्तर गोवा : मार्च १८, एप्रिल १२, मे १९, जून १२

  दक्षिण गोवा : मार्च २१, एप्रिल १८, मे १९, जून २४

१० जूनपर्यंत तपासणी अहवाल

  पोळे चेकनाका : ३३,८०५ नमुने

  पत्रादेवी चेकनाका : ३३,९८९ नमुने

  मडगाव मासळी बाजार : १,३२,७१७ नमुने

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com