Vasco: मुरगाव, वास्कोत धान्य काळाबाजार सुरुच; 'गोवा फर्स्ट'चा आरोप कायम

गोवा फर्स्टने नागरी पुरवठा संचालनालयाकडे केली होती तक्रार
Vasco
Vasco Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: मुरगाव, वास्कोत स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या काळा बाजाराविषयी गोवा फर्स्टने तक्रार केली होती. या तक्रारीला नागरी पुरवठा संचालनालयाकडून मिळालेल्या उत्तरावर गोवा फर्स्टने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच धान्य घोटाळा सुरुच असल्याचा आरोप केला आहे.

(Goa First NGO has alleged that a scam in a cheap grain shop in Vasco, Mormugao )

सविस्तर वृत्त असे की, वास्को मुरगाव व नवेवाडे येथे स्वस्त धान्य दुकान मालकांकडून धान्याचा काळा बाजार होत असल्याची तक्रार गोवा फर्स्टने नागरी पुरवठा संचालनालयाला केली होती. त्यानुसार त्यांनी दुकानमालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती खरी, मात्र त्यांचे उत्तर समाधानकारक नव्हते, तरीही त्या दुकानावर कारवाई झाली नाही व स्वस्त धान्य दुकान चालूच आहे असा दावा गोवा फर्स्टने केला आहे.

Vasco
Fatorda: पूर्व वैमनस्यातून एकाला भर रस्त्यात मारहाण; फरार तिघे पोलिसांच्या ताब्यात

याव्यतिरीक्त नागरी पुरवठा संचालनालयाने दैनंदिन व्यवहाराचे ऑडीट आणि चौकशी करण्याऐवजी गोवा फर्स्टला अशा बेकायदेशीर दुकानांची यादी पाठवण्यास सांगितले. असल्याने गोवा फर्स्टने नाराजी व्यक्त केली आहे. तसे असल्यास नागरी पुरवठा विभागाची व अधिकाऱ्यांची गरज कसली असा सवाल गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेने केला आहे.

Vasco
Mopa Airport: कोण, कधी, कुठे? मोपा विमानतळाबाबत सर्व प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी दिली उत्तरे

गोवा फर्स्ट ही संस्था बेकायदेशीरकृत्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आहे. ती तपास यंत्रणा नाही. याच्यावरून उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांचे असे उत्तर दर्शवते कि, विभाग अशा सर्व गैरप्रकारांबद्दल जागरूक आहे आणि सर्व स्वस्त धान्य दुकान मालकांना बंपर ऑफर देऊन कर लुबाडण्याचा हा एक प्रकार असल्याचे गोवा फर्स्टने आपल्या नागरी पुरवठा खात्याला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com