Goa Enironment: राज्यात प्‍लास्‍टिकबंदी कागदावरच

Goa Enironment: मडगावात प्लास्टिक पिशव्‍यांचा चोरून वापर
Single use Plastic Ban Goa
Single use Plastic Ban GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Enironment: राज्यात प्लास्टिकच्या वापरावर पूर्णत: बंदी असली तरी मडगावातील काही व्यापारी छुप्या मार्गाने या वस्तूंचा वापर करीत आहेत. दुसरीकडे काही विक्रेते या नियमाचे काटेकोरपणे पालनही करीत आहे. सरकारने प्‍लास्‍टिकला थेट पर्याय उपलब्‍ध करून द्यावा, अशी मागणी विक्रेत्‍यांनी केली आहे.

गेल्‍या जुलै महिन्‍यापासून राज्यात प्लास्टिकच्या वापरावर सरकारने बंदी लागू केली आहे. यात स्वयंपाक घरातील वस्तू, सजावटीच्या प्लास्टिकच्या वस्तू, शीतपेयांचे स्ट्रॉ, खाद्यपदार्थातील कप, चमचे, स्टीकर, सजावटीसाठीचे थर्माकोल या वस्तूंची काही विक्रेते अजूनही खुलेआम विक्री व वापर करीत आहेत. अन्य पर्याय नसल्याने प्लास्टिकच्या वापरातील वस्तूंचा वापर वाढला आहे.

शीतपेयांच्‍या बाटल्‍या सीमेवर रोखा :

एका विक्रेत्‍याने सांगितले की, मोठमोठ्या शीतपेय कंपन्यांची शीतपेये, पाणी जाड प्लस्टिकच्या बाटलीतून येते. शीतपेय संपल्यानंतर या बाटल्‍या फेकून देण्यात येतात. त्‍यामुळे पर्यावरणाला हानिकारक असलेला कचरा सर्वत्र पसरत आहे. सरकारला जर पर्यावरणाची खरोखरच काळजी असेल तर अशा शीतपेय कंपन्यांच्या वस्‍तूंना सीमेवरून राज्यात प्रवेश देऊ नये.

  • जनजागृतीची नितांत गरज

"कागदाची पिशवी फाटण्याची भीती असल्याने ती घेण्यास ग्राहक नकार देतात. त्यामुळे काही विक्रेते नाईलाजाने प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरात आणतात. तसेच काही दुकानदारांना किती मायक्रॉनच्‍या प्लास्‍टिक पिशवीचा वापर करावा याविषयी माहिती असत नाही. यासाठी सरकारने जनजागृती करायला हवी."

- विनोद शिरोडकर, मडगाव न्यू मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष

Single use Plastic Ban Goa
Goa University: कामचुकार शिक्षकांवर आता कारवाईचा बडगा
  • कागदी, कापडी पिशव्‍यांना मर्यादा

"कपडा आणि कागदाच्या पिशव्‍या उपयोगात आणल्या तरी प्लास्टिकला हा पर्याय होऊ शकत नाही. प्लास्टिक पिशव्‍यांमुळे कुठल्याही वस्तू, पदार्थांचे पावसापासून, पाण्यापासून संरक्षण होऊ शकते. मात्र कागद आणि कपड्यामुळे ते होऊ शकत नाही. प्लास्टिकला तोडीचा पर्याय हवा, तरच त्‍याचे उच्चाटन शक्‍य आहे. कारण प्‍लास्‍टिकचा भस्‍मासुर गाडणे काळाची गरज आहे."

- शेखर नाईक, व्यापारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com