पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! ‘दूधसागर’ खुला करण्याबाबत हालचाली, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली 'ही' माहिती

अधिकाऱ्यांची पाहणी ः पर्यटकांची गैरसोय; हुल्लडबाजी टाळण्यावर खल
Dudhsagar Waterfall
Dudhsagar Waterfall Dainik Gomantak
Published on
Updated on

Dudhsagar Waterfall दूधसागर धबधबा सध्या फेसाळत आहे. गेल्या शनिवारी व रविवारी 4 ते 5 हजार पर्यटक अचानक धबधब्याजवळ आल्याने संबंधित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. पर्यटकांचा व त्यांना काढायला लावलेल्या उठाबशांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

त्या पार्श्वभूमीवर अनेकांनी संतापही व्यक्त केला. याची पुनरावृती होऊ नये, तसेच पर्यटकांची गैरसोय व हुल्लडबाजी टाळण्यासाठी काय करता येईल, शिवाय धबधबा कधी खुला करता येईल,यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी दि. 18 जुलै रोजी दूधसागर धबधब्याजवळ येऊन पाहणी केली.

दूधसागर धबधब्याच्या मुख्य प्रवाहात बुडून मृत्यू होत असलेल्या अनेक घटनांची दखल घेऊन तत्कालीन दक्षिण गोवा जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांनी सप्टेंबर 2022 साली संबंधित यंत्रणेला निर्देश जारी केले होते.

त्या आदेशाची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने की नाही, हे पाहण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू ए. यांच्या नेतृत्वाखाली सबंधित यंत्रणेने दूधसागरवर भेट देऊन पाहणी केली.

Dudhsagar Waterfall
Pissurlem Mines Issue : पिसुर्लेतील खाणींकडे सरकारचे दुर्लक्ष

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठवाले, दीपक देसाई ,विशाल कुंडईकर ,दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचे अधिकारी, गोवा वन विभागाचे अधिकारी आनंद जाधव, सिद्धेश नाईक, वास्को रेल्वेचे निरीक्षक आनंद शिरोडकर, सायबर क्राईमचे अधीक्षक शिवेंद्र भूषण, उपजिल्हाकारी नीलेश धायगोडकर उपस्थित होते.

Dudhsagar Waterfall
चिंताजनक! मधुमेहाचा विळखा वाढतोय; दोन वर्षातली नव्या रुग्णांची आकडेवारी समोर

तत्कालीन जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांनी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करणे व त्याशिवाय अतिरिक्त आणखी काही उपाययोजना करता येईल का, याचाही अंदाज यावेळी घेण्यात आला.

रेल्वे पोलिसांना दररोज पुलावर व आजूबाजूला पेट्रोलिंगचे आदेशही दिले होते. शिवाय जे आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा आदेश देण्यात आला होता. याची अमंलबजावणी पुन्हा करायला लावली आहे. -नीलेश धायमोडकर, उपजिल्हाधिकारी धारबांदोडा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com