Goa-Dubai Flight : दाबोळीवरुन लवकरच सुरू होणार गोवा-दुबई फ्लाईट; एअर इंडियाची माहिती

गोव्यातून दुबईला जाणारी गोवा-दुबई (GOI-DXB) ही फ्लाईट येत्या 26 मार्चपासून सुरू होणार आहे.
Goa-Dubai Flight
Goa-Dubai Flight Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa-Dubai Flight : गोव्यात काही दिवसांपासून मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाले आहे. विमानतळावरून उड्डाणे देखील सुरू झाली आहेत. मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर दाबोळी विमानतळाचे काय होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मात्र गोव्यात नवीन विमानतळ होण्याने दाबोळीच्या उड्डाणांवर कोणताही परिणाम झाला नाहीये.

याबाबत एक नवीन माहिती अशी की, दाबोळी विमानतळावरुन एअर इंडियाने नव्या उड्डाणाची माहिती दिली आहे. गोव्यातून दुबईला जाणारी गोवा-दुबई (GOI-DXB) ही फ्लाईट येत्या 26 मार्चपासून सुरू होणार आहे.

माहितीनुसार, ही फ्लाईट सोमवार, मंगळवार, शनिवार आणि रविवारी असणार आहे. इंधनाचे दर कमी झाल्यामुळे विमान कंपन्यांची गोव्याकडे पसंती वाढली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com