Goa Drugs Case: वाढत्या अपघाताप्रमाणेच राज्यात वाढत्या अमली पदार्थांच्या विक्रीमुळे राज्याची प्रतिमा डागाळली जातेय. राज्यात विशेषतः किनारी भागात अंमली पदार्थांची खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु असून पोलिसांच्या सतर्कतेने यातील काही आरोपी गजाआड होत आहेत.
हणजूणमध्ये पोलिसांनी अशीच एक कारवाई करत मूळ पश्चिम बंगाल पण सध्या खासगी नोकरीसाठी हणजूण येथे कार्यरत असलेल्या एकाला अमली पदार्थांच्या विक्री प्रकरणात ताब्यात घेतलंय.
हणजूण येथे शुक्रवारी ही कारवाई करत पोलिसांची छापेमारी केलीय. या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी अली आझम सरकार (वय-26 वर्षे) ग्राहकांना ड्रग्ज विक्री करणार असल्याची खबर हणजूण पोलिसांना मिळाली होती.
ही माहिती मिळताच पोलिसांनी झोर वाड्डो, हणजूण येथे सापळा रचला. दरम्यान दुपारी 01.25 ते 03.40 च्या दरम्यान सदर आरोपी आपल्या ग्रे रंगाच्या ॲक्टिव्हा स्कूटरमधून घटनास्थळी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आला.
पोलिसांनी त्याला पकडत त्याच्याकडून 05.80 ग्रॅमच्या गुलाबी रंगाच्या रु. 1.10,000/-. किमतीच्या ड्रग्जच्या गोळ्या जप्त केल्या आणि त्याच्यावर NDPS Act अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केलीय.
या कारवाईत PSI स्नेहा सावळ, PC दिपेश चोडणकर, PC अभिषेक कासार, PC क्रिशन बुगडे आणि PC अनिकेत पेडणेकर यांच्या पोलीस पथकाने सक्रिय भाग घेतला.
गोव्याच्या किनारी भागात होणाऱ्या अमली पदार्थांची विक्री थांबवण्याचे पोलीस प्रशासनासमोर आवाहन निर्माण झाले असून अशा घटनेत स्थानिकांपेक्षा परप्रांतीयांचा हात असल्याचे वारंवार समोर आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.