Valpoi News: वाळपईत शासनाच्या पशू खात्यातर्फे दूध उत्पादकांसाठी आयोजीत केलेल्या एक दिवसीय मेळाव्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. राज्यभरतील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
मात्र मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि खुद्द पशुसंवर्धन मंत्री निळकंठ हळर्णकरांनी उद्घाटन सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. एक दिवसीय मेळाव्याला मंत्र्यांना आमच्या समस्या, व्यथा ऐकून घेण्यासाठी वेळ मिळू नये या बद्दल शेतकरी वर्ग नाराज झाला होता.
मात्र खात्याचे संचालक प्रसाद वळवईकर यांनी शेतकऱ्यांना आश्वासीत करत 'तुमचे प्रश्न आणि व्यथा सरकारकडे पोहोचविणार' असल्याचे सांगितले.
उद्घाटन कार्यक्रमाला संचालक प्रसाद वळवईकर, डॉ. नितीन नाईक, राजेश केणी, डॉ. रामा परब, प्रसाद कामत सांबरे, विनोद जोशी, प्रीतम पाटील, शिकेरी गोशाळेचे कमलाकांत तारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत सुभाष गावस आणि सिद्धी उपाध्याय हिने केले तर आभार प्रदर्शन डॉ. रामा परब यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.