Sasashti News : महिलांनी सक्षम होण्यावर भर द्यावा: सुलक्षणा सावंत

Sasashti News : बोर्डा मडगाव येथे सीमा मूर्ती व धनंजय मूर्ती यांच्या भरजरी या पारंपरिक पोशाख आस्थापनाच्या विस्तारीत काउंटरचे उद्‌घाटन केल्यावर त्या बोलत होत्या.
Sulakshana Sawant
Sulakshana SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Sasashti News : सासष्टी महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभा करून, त्याचा जिद्दीने व प्रामाणिकपणे विस्तार करून सक्षम होण्यावर भर द्यावा, असे भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रभारी सुलक्षणा प्रमोद सावंत यांनी आवाहन केले.

त्यांनी पुढे सांगितले, की स्त्री शक्ती जेव्हा एकत्र येते, तेव्हा एक मोठे काम त्यांच्याकडून घडत असते. केंद्र व राज्य सरकारच्या महिलांसाठी स्वतंत्र व्यवसायासाठी अनेक योजना आहेत, त्यांचाही लाभ महिलांनी घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

बोर्डा मडगाव येथे सीमा मूर्ती व धनंजय मूर्ती यांच्या भरजरी या पारंपरिक पोशाख आस्थापनाच्या विस्तारीत काउंटरचे उद्‌घाटन केल्यावर त्या बोलत होत्या.

Sulakshana Sawant
Goa Forward: मच्छीमार निधीत पाचपटीने कपात; गोवा फॉरवर्डचा आरोप

याप्रसंगी महिला आयोगाच्या चेअरमन रंजिता पै, मडगावच्या उपनगराध्यक्ष दिपाली सावळ, अलका सुभाष फळदेसाई. डॉ. स्नेहा भागवत उपस्थित होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com