Curchorem Crime Case: श्रीरामांबद्दल अपमानास्पद पोस्ट; जाहीर माफीनंतर संबंधीत पोलिसांच्या ताब्यात

Curchorem Crime Case: गेल्या तीन दिवसातली ही चौथी घटना असून म्हापसा शहारत दोन तर पणजीतील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.
Social Media
Social MediaDainik Gomantak
Published on
Updated on

Curchorem Crime Case: कुडचडे येथे श्रीरामांबद्दल अपमानास्पद पोस्ट करण्याचा प्रकार घडला असून सदर तरुण कुडचडे राम भक्तांच्या हाती सापडला आहे.

या राम भक्तांनी त्या तरुणाला कुडचडे येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्कलसमोरील महाराजांच्या पुतळ्यासमोर जाहीर माफी मागण्यास भाग पडून त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती मिळली आहे.

Social Media
पॉलिटेक्निक कॉलेजमधील विद्यार्थ्याची प्रभू श्रीरामांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; संबंधीत विद्यार्थी पणजी पोलिसांच्या ताब्यात

गेल्या तीन दिवसातली ही चौथी घटना असून म्हापसा शहारत दोन तर पणजीतील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

कॉलेजमधील युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून म्हापश्यातील घटनेबाबत पोलिसांची मोहीम सुरु आहे. त्याअगोदर अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने लावलेले बॅनर फाडल्याचा प्रकार पर्वरीत आठवडाभरापूर्वी झाला होता.

पोलिसांनी घटस्थावरचे cctv फुटेज तपासात संबंधित तरुणाला तब्यत घेतले होते. आता राम मंदिरातील प्रतिष्ठापना सोहळ्यांनंतरही गोव्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रकार घडले आहेत.

नजीकच्या सिंधुदुर्गातही असेच प्रकार मागील तीन दिवसात घडल्यावर भाजपचे राजन तेली यांनी अन्य हिंदू संघटना आणि बांधवांसह सावंतवाडी पोलीस स्थानकात अधिकाऱ्यांची भेट घेत संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com