Goa Crime: कार ओव्हरटेक केली म्हणून 'त्या' युवतीसह तिच्या मित्राला केली मारहाण; तिघेही फरार संशयित जेरबंद

कोलवाळ पोलिसांची कारवाई, सावंतवाडीतून घेतले ताब्यात
Goa Crime:
Goa Crime: Dainik Gomantak

Goa Crime: रोडरेजवरून दुचाकीवरील युवतीसह तिच्या मित्राला तिघा जणांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार कोलवाळ येथे घडला होता. या प्रकरणी तिघेही संशयित फरार होते. कोलवाळ पोलिसांनी या तिन्ही संशयितांना आज, सोमवारी पकडले.

आज पहाटे सावंतवाडी येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. तिघाही आरोपींना पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांच्या कारला या कपलने ओव्हरटेक केले त्यामुळे त्यांनी दोघांनाही मारहाण केल्याचे म्हटले आहे. देवेंद्र टेंबकर (वय 25, रा. कोलवाळ), पंकज साडेकर (रा. कोलवाळ) आणि पंकज साळगावकर अशी त्यांची नावे आहेत.

Goa Crime:
Margao Railway Station वर नवीन वर्षापासून पॉड हॉटेल; कोकण रेल्वेचा उपक्रम

पैकी देवेंद्र हा अल्टो कारमधून जात होता. यावेळी त्याला ओव्हरटेक करून हे कपल पुढे गेले. त्यानंतर त्याने त्यांच्यापुढे गाडी घेऊन गाडी आडवी मारली. तिथून पंकज साडेकर याला फोन केला. तो अॅक्टिव्हा (GA 03 AL 4846) वरून तिथे आला.

या दोघांसह पंकज साळगावकर अशा तिघांनी मिळून युवती आणि तिचा मित्र या दोघांना शिविगाळ करत त्यांना मारहाण केली आणि पळून गेले.

या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी मारहाणीचा हा प्रकार घडला होता. दरम्यान, आरोपींची अल्टो कारही जप्त करण्यात आली आहे.

Goa Crime:
Goa Casino Theft: गोव्यातील कॅसिनोमधून चोरल्या 13 लाख रुपयांच्या कॅसिनो चिप्स

म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी म्हणाले की, गोव्यात अशी गुंडागर्दी चालू देणार नाही. रोडरेजच्या मुद्यावरून तर अजिबात असे काही खपवून घेणार नाही. तिघाही संशयितांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

पोलिस निरीक्षक विजय राणे, पोलिस उपनिरीक्षक कुणाल नाईक यांच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com