गोव्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. परिणामी काल (बुधवार, 3 डिसेंबर) काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. मडगाव, बाणावली, कोलवा तसेच नावेली भागात अचानक पाऊस सुरू झाला.
इथे पहा व्हिडिओ:
हिवाळा सुरू असताना पाऊस पडल्याने अनेकांची धावपळ झाली. पुढील काही दिवस असेच वातावरण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज (4 डिसेंबर) संध्याकाळपर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. हिवाळा सुरू झाला तरी उकाडा कमी होण्याचे नाव घेत नव्हता. मात्र मागील काही दिवसांपासूनच हवामानामध्ये जरा गारवा जाणवू लागला आहे. त्यातच पाऊस पडल्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.