Goa Narcotics Case: बायणा समुद्र किनारी 65 हजांराचा गांजा जप्त; मुरगाव पोलिसांची कारवाई

Goa Narcotics Case: या दोघा युवकांनी हा गांजा दुचाकीच्या डिकीमध्ये लपवला होता
Goa Narcotic Raid
Goa Narcotic RaidDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Narcotics Case: मुरगाव पोलिसांनी बायणा समुद्र किनारी फिरणाऱ्या दोन युवकांकडून गांजा जप्त केलाय. अंदाजे 65 हजार किमतीचा गांजा असून पोलिसांनी मांगोरहिल आणि वास्को येथील दोघं युवकांविरोधात अंमली पदार्थ गुन्ह्याखाली नोंद केलाय.

मुरगावचे पोलिस उपअधीक्षक शेख सलीम यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आलीय. या कारवाईत पोलिस निरीक्षक अल्वीटो रॉड्रिगीस, उपनिरीक्षक उदय साळुंखे, हवालदार अय्याज शेख, शिपाई विवेक भगत, वासू पटेल, अफास शाह यांनी सहभाग घेतला होता.

Goa Narcotic Raid
Table Tennis Association: नवी कार्यकारिणी जाहीर! व्यावसायिक पातळीवर ज्युनियर लीग सुरू करणार- अध्यक्षांची ग्वाही

अवैधरित्या गांजा बाळगल्या प्रकरणी दयानंद बाबू लमाणी (वय 20, रा. मांगोरहिल वास्को) मल्लेश रमेश चव्हाण (वय.26, रा. बायणा मुरगाव) यांच्या विरोधात भादंस 20 (b)(॥) (A) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय.

या दोघा युवकांनी हा गांजा दुचाकीच्या डिकीमध्ये लपवला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जात त्यांनी आरोपींना रंगेहाथ पकडत कारवाई केलीय.

काही दिवसांपूर्वी कळंगुट नाईकवाडा-कळंगुट येथे कळंगुट पोलिसांकडून गुरुवारी रात्री करण्यात आलेल्या कारवाईत 94 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला होता. गोव्यात अशा घटना हल्ली सर्रास घडत असून या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com