Goa Court Judgement: ड्रग्ज प्रकरणात पंढरपूरच्या विनोदला गोव्यात 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा; 25 हजारांचा दंड

Goa Court Ruling: विनोद चव्हाणला पणजी पालिकेच्या मार्केटजवळ १.१० किलोग्रॅम वजानाचा गांजा हा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
Pandharpur man jailed for drugs in Goa
Goa Court JudgementDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी विनोद चव्हाण (रा. पणजी, मूळ पंढरपूर, सोलापूर) या व्यक्तीला पाच वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे. उत्तर गोव्यातील अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंगळवारी (०३ मे) याबाबत निर्णय दिला आहे. २०१७ साली विनोद चव्हाणला अटक करण्यात आली होती.

विनोद चव्हाणला पणजी पालिकेच्या मार्केटजवळ १.१० किलोग्रॅम वजानाचा गांजा हा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या गांजाची बाजारातील किंमत १ लाख १० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. विनोद पणजीतील बाल गणेश मंदिराजवळ वास्तव्यास होता. तो मूळचा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचा रहिवासी आहे.

Pandharpur man jailed for drugs in Goa
Goa Taxi Issue: कोणी म्हणाले जीवन संपवू, कोणी म्हणाले दारावर भीक मागू; मायकल लोबो अन् टॅक्सी चालकांत उडाले खटके

विनोद जवळ अमली पदार्थ असल्याची टीप पणजी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या माहितीच्या आधारे पणजी मार्केटजवळ रेड टाकत विनोदला अटक केली होती. पोलिस उपनिरीक्षक अरुण देसाई या प्रकरणाचा तपास करत होते. अखेर विनोदला २५ हजार रुपयांच्या दंडासह ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com