CM Pramod Sawant: पायलट, मच्‍छीमार, विक्रेत्‍यांशी सुसंवाद; उत्तर गोवा दौरा ठरला लक्षवेधी

CM Pramod Sawant:कामांची विकासात्‍मक उजळणी
Goa Today's Online News Update | Breaking News In Marathi | CM Sawant
Goa Today's Online News Update | Breaking News In Marathi | CM SawantDainik Gomantak

CM Pramod Sawant: मुख्‍यमंत्रिपदाची पाच वर्षे पूर्ण केल्‍याच्‍या पार्श्वभूमीवर प्रमोद सावंत यांनी मंगळवारी ‘विकसित भारत’ व ‘मोदी की गॅरेंटी संकल्‍प पत्र’ अभियान अंतर्गत केलेला उत्तर गोवा दौरा विशेष लक्षवेधी ठरला.

विकासात्‍मक कामांची जोरदार उजळणी करत त्‍यांनी विरोधकांवर व खासकरून काँग्रेसवर शाब्‍दिक तोफगोळे डागले. दिवसभरात हणजूण, नेरुल, साळगाव, चिंबल, सांताक्रूझ, जुनेगोवे, कुंभारजुवे आदी ठिकाणी कार्यकर्ते, नेत्‍यांसोबत सर्वसामान्‍य विक्रेते, दुचाकी पायलट, टॅक्‍सी व्‍यावसायिक, महिला, मच्‍छीमार, वृद्धांशी प्रभावीपणे संवाद साधून त्‍यांच्‍या अपेक्षा जाणून घेतल्‍या. मात्र, निवडणूक आचारसंहितेमुळे ठोस आश्वासन किंवा शब्द देणे त्यांनी टाळले.

Goa Today's Online News Update | Breaking News In Marathi | CM Sawant
Goa Court: किनाऱ्यांवरील अतिक्रमणांवर फौजदारी कारवाई करा, कोर्टाच्या पर्यटन खात्‍याला सक्त सूचना

रात्री10 नंतर संगीत वाजविल्यास कारवाई:

हणजूण - वागातोर परिसरात रात्री १० वाजल्यानंतर कर्णकर्कश संगीत वाजविले जाते. याबाबत तक्रार दिल्यास पोलिस कारवाई करीत नाही अशी गाऱ्हाणी ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली.

यावर मुख्यमंत्र्यांनी रात्री १० वाजल्यानंतर संगीत वाजवून ध्वनिप्रदूषण केल्यास ते बंद केले जाईल. याविषयी मी पोलिसांना कारवाईचे निर्देश देणार आहे, असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com