Children Film Festival : बुलबुल बाल चित्रपट महोत्सवामुळे मुलांच्या चेहऱ्यांवर आनंद

Children Film Festival : काही चांगले चित्रपट पहाण्याबरोबरच खुल्या मंचावरील दर्जेदार कार्यक्रम तसेच वेगवेगळ्या कार्यशाळा व स्पर्धांचा आनंद लुटत आहेत.
Children Film Festival
Children Film Festival Dainik Gomantak
Published on
Updated on

Children Film Festival : सासष्टी, गोव्याच्या माहिती व प्रसिद्धी खात्याच्या सहकार्याने मडगावात रवीन्द्र भवनात अंतरंग प्रॉडक्शनने आयोजित केलेला बुलबुल बाल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मडगाव शहरात आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

बाल गोपाळांसह त्यांचे पालक व आजी-आजोबाही या महोत्सवाला भेट देत आहेत. काही चांगले चित्रपट पहाण्याबरोबरच खुल्या मंचावरील दर्जेदार कार्यक्रम तसेच वेगवेगळ्या कार्यशाळा व स्पर्धांचा आनंद लुटत आहेत.

उद्या महोत्सवाचा समारोप सोहळा होणार असून गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पर्यटन मंत्री रोहन खंवटे हे सन्माननिय अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून आमदार दिगंबर कामत, माजी आमदार दामू नाईक यांचीही उपस्थिती असणार आहे.

समारोप सोहळ्यात सुवर्ण बुलबुल सर्वोत्कृष्ट चित्रपटाची घोषणा केली जाईल. शिवाय इतर पारितोषिके प्रदान करण्यात येतील. समारोप सोहळ्या नंतर महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दाखविला जाईल.

महोत्सवाच्या तिसऱ्या व आज चौथ्या दिवशी सकाळच्यात सत्रामध्ये दोन्ही दिवस जवळ जवळ चार हजार विद्यार्थ्यांनी दोन ते तीन चित्रपट पाहिल्याची माहिती महोत्सवाचे संचालक बिपीन खेडेकर यांनी या प्रतिनिधीला दिली.

एवढा प्रचंड प्रतिसाद मिळेल असे आम्हाला वाटले नव्हते. आता पुढील वर्षी अधिक चांगल्याप्रकारे चित्रपट महोत्सव आयोजण्याचा हुरुप वाढल्याचे संचालक सिद्धेश नाईक यांनी सांगितले.

Children Film Festival
Goa News 13 January: सिकेरी हत्याकांड, बाबूश - पर्रीकर वाद, पॅलेनस्टाइन पाठिंबा प्रकरण सोबतच राज्यातील अन्य घडामोडी एका क्लिकवर

पाच दिवसांच्या या महोत्सवात २६ देशातील एकूण लहान मोठ्या १३५ चित्रपटांचे प्रदर्शन झाले.शाळा, कॉलेजचे विद्यार्थी सकाळच्या व दुपारच्या सत्रात गर्दी करीत आहेत असेही ते म्हणाले.

आम्ही गोव्यातील सुमारे १०० शाळा कॉलेजमध्ये जाऊन महोत्सवाबद्दल जागृती केली. त्यामुळे त्यांच्या पालक व शिक्षकांनी बाल चित्रपट महोत्सव पाहण्यासाठी खास सहलीचे आयोजन केल्याची माहितीही खेडेकर यांनी दिली. तेथे फिरत असलेले वेगवेगळे वेष परिधान केलेल्या मुलांच्या आवडत्या पात्रांकडे मुले जास्त आकर्षित होत आहेत.

या महोत्सवाला सांगे, काणकोण, नेत्रावळी या भागातील विद्यर्थीही उपस्थित लावत आहेत. आम्ही कधी ‘इफ्फी’ला गेलो नव्हतो, असे एका विद्यार्थ्यांने सांगितले.

Children Film Festival
BJP Goa - ...आणि 'बाबुश'वर कडाडले भाजप प्रवक्ते! | Gomantak TV

मास्टर, मिस बुलबुल फॅशन शो

महोत्सवात चौथ्या दिवशी (शुक्रवारी) प्रसिद्ध सिने निर्माते व दिग्दर्शक अमित मसुरकर यांनी चित्रपट निर्मितीवरील कार्यशाळेत मार्गदर्शन केले. शिवाय बाल चित्रपटाचे महत्व या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

खुल्या रंगमंचावर मास्टर व मिस बुलबुल हा मुलांसाठीचा फॅशन शो व नृत्य सादरीकरण हे आकर्षण होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com