Child Obesity: सावधान... राज्यातील मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतोय! पालकांचे दुर्लक्ष, अतिलाडपणा ठरतोय घातक; बालरोग तज्ञांनी दिला 'हा' सल्ला

Childhood Obesity In Goa: राज्यात मागील काही वर्षात मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून बालरोग तज्ञ याबाबत चिंता व्यक्त करत आहेत.
Childhood Obesity In Goa
Childhood Obesity In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात मागील काही वर्षात मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून बालरोग तज्ञ याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. मुलांमध्ये जंकफुड खाण्याचे वाढलेले प्रमाण, बदललेली जीवनशैली, शारीरिक हालचालीतील घट आणि या सर्वांकडे पालकांचे होणारे दुर्लक्ष, यामुळे आता केवळ सुसंपन्न घरातीलच नव्हे, तर सर्वस्तरातील मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. ही अतिशय धोक्याची घंटा आहे.

सहा महिन्याच्या बाळापासून १२ वर्षाच्या मुलापर्यंत लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. केवळ १० टक्के लठ्ठपणाची प्रकरणे वैद्यकीय परिस्थितीशी संबंधित आहेत. या लठ्ठपणा वाढीवर लक्ष देत काम केले नाहीत तर भविष्यात त्यांना अतिशय दुर्धर आजारांना सामोरे जावे लागू शकते. मुलांच्या वाढत्या वयात संतुलित आणि पोषणयुक्त आहार गरजेचा आहे.

जर लठ्ठ मुलांची जीवनशैली बदल घडला नाहीतर, भविष्यात त्यांना टाईप-२ मधुमेह, फॅटी लिव्हर, ऑस्टियोपोरोसिस आणि हृदयरोग, मूत्रपिंड आणि यकृताच्या समस्या होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे मुलांच्या खाण्याच्या सवयी आणि योग्य जीवनशैली अवलंबिण्यास पालकांनी मुलांना प्रवृत्त करणे गरजेचे आहे.

Childhood Obesity In Goa
Goa Fake Police: तोतया पोलिसांचा सुळसुळाट; भरदिवसा दोघांचे दागिने हातोहात लंपास, ज्‍येष्‍ठांसह महिला 'टार्गेट'वर

चॉकलेट, जंकफुड नको

  • लहान बाळाला किमान सहा महिने स्तनपान करणे गरजेचे.

  • शक्यतो फूड सप्लिमेंट्स टाळाच.

  • मुलांचा मोबाईल आणि टीव्हीची अतिरेक

  • मुलांना व्यायाम आणि खेळासाठी प्रवृत्त करा.

लहान मुलांना अधिक भरविणे, अधिक स्क्रिनटाईम, व्यायामाचा अभाव, जेनेटीक, कुटुंबातील तणाव तसेच पोषक अहाराच्या अभावामुळे मुलांमध्ये प्रामुख्याने लठ्ठपणा वाढत आहे. यासाठी पालकांनी खरेतर पहिल्यांदा आपली जीवनशैली चुकीची असेल तर तिच्यात बदल करायला हवा. योग्य संतुलित आहाराची सवय लावणे गरजेचे आहे.

- डॉ. सुप्रिया प्रभू देसाई धोंड, आयुर्वेदिक वैद्य

Childhood Obesity In Goa
Goa Weather Update: राज्यात पावसाचा लपंडाव सुरूच! जोरदार सरींनंतर आता पुढील 48 तासांत पावसाची गती मंदावणार

आजकाल लहान मुलांना चॉकलेट, साखर असलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात दिले जातात. मुलांना भरविण्यासाठी मोबाईल हातात दिला जातो. एका अर्थी पालक आपली जबाबदारी झटकतात. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपली जबाबदारी कळली पाहिजे. त्याबाबत शिकले पाहिजे. मुलाचे संगोपन योग्यरित्या करणे, त्याला चांगल्या सवयी लावणे ही पालकांची जबाबदारी आहे.

- डॉ. पुनम संभाजी, बालरोगतज्ञ आणि नवजात बालक विशेषज्ञ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com