Video: CM सावंत यांनी पुन्हा घडवलं माणुसकीचं दर्शन; अपघात पाहताच तात्काळ थांबवला ताफा

Goa Chief Minister Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत यांचा अपघातग्रस्तांना मदत करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Goa Chief Minister Pramod Sawant
Goa Chief Minister Pramod SawantDainik Gomantak

Goa Chief Minister Pramod Sawant Helped An Accident Victim: राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन घडवलं. काल रात्री घोगळ मडगाव येथे अपघात पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवला. त्यानंतर ते अपघातग्रस्ताला मदत करण्यासाठी पुढे सरसावले.

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी मोठ्याप्रमाणात लोक जमा झाले होते. रुग्णवाहिकेला बोलावून जखमींना तात्काळ रुग्णालयात पोहोचवण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांचा अपघातग्रस्तांना मदत करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

यापूर्वीही CM सावंत यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं

याआधीही, मुख्यमंत्र्यांनी आपल्या कृतीतून माणुसकी दर्शन घडवलं आहे. 16 मार्च रोजी मुख्यमंत्री सावंत दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी येथून विकास भारत संकल्प यात्रेला संबोधित करुन परतत होते. वाटेत अपघात (Accident) झाल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवला होता.

Goa Chief Minister Pramod Sawant
CM Pramod Sawant: ''किनारी भागातील व्यवसायांच्या संरक्षणासाठी...''; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं आश्वस्त

एकाचा मृत्यू झाला

एका वरिष्ठ पोलीस (Police) अधिकाऱ्याने सांगितले की, चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले, त्यानंतर ट्रक पलटी होऊन दरीत कोसळला. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू, तर पाच मुले आणि तीन महिलांसह 13 जण गंभीर जखमी झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com