Goa Budget Session 2024 Live: राज्यातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा , एका क्लिकवर

Goa Latest News Live in Marathi (9 February 2024): पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील ब्रेकिंग न्यूज...
Today's Goa News in Marathi (9 Feb 2024) | Goa Budget Session News |
Today's Goa News in Marathi (9 Feb 2024) | Goa Budget Session News | Dainik Gomantak
Published on
Updated on

भरधाव कॅटेनरचा गवंडळी मार्गावर अपघात; चालक जखमी

गुजरात पासिंगच्या भरधाव कॅटेनरची गवंडळी मार्गावरील रॉडला धडक. या अपघातात चालक जखमी झाला असून कंटेनरचे देखील नुकसान झाले आहे. सदर कंटेनर कुंडईहून पणजीच्या दिशेने जात असताना हा अपघात झालाय. या मार्गावर अवजड वाहनांना बंदी असूनही या वाहतूक सुरूच असल्याचे समोर आलंय.

गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वाराचा अपघात

स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने एका दुचाकीस्वाराचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झालाय. ही घटना काकोडा औद्योगिक वसाहतीजवळ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

स्पीड ब्रेकरजवळ स्ट्रीट लाईट नसल्यामुळे तसेच स्पीडब्रेकर न रंगवल्याने हा अपघात झाल्याचे समजतेय. सदर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कुडचडे आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा!

पोर्तुगालमध्ये जन्माची नोंदणी असलेल्यांचे भारतीय पासपोर्ट असेल रद्द करण्याबाबत सरकार गंभीर. आम्ही या विषयावर परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाशी चर्चा करू. महिनाभरात पाठपुरावा केला जाईल. गरज पडल्यास परराष्ट्रमंत्र्यांकडे निवेदन देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिले.

22 जानेवारीला सुट्टी नाही, अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर

दरम्यान, या खासगी प्रस्तावाचे दोन भागात विभागणी करण्यात आली. एकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अभिनंदन करणारा प्रस्ताव तर, दुसरा सुट्टीचा प्रस्ताव होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पहिल्या प्रस्तावासाठी सरकारची अनुमती दर्शवली. मतदानात हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

22 जानेवारी धार्मिक एकचार दिवस म्हणून घोषित करावा - दाजी साळकर

अयोध्येत 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा झाली हा दिवस धार्मिक एकचार दिवस म्हणून घोषित करावा तसेच, या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी या मागणीसाठी वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी खासगी प्रस्ताव मांडले आहे.

या खासगी प्रस्तावाला उल्हास तुयेकर, दिगंबर कामत, रुडॉल्फ फर्नांडिस, मायकल लोबो यांनी समर्थन केले. तर, वेंझी व्हिएगस, क्रूझ सिल्वा, आल्टन डिकॉस्ता यांनी या ठरावाला विरोध केला.

मी खाणींच्या विरोधात नाही - डॉ. चंद्रकांत शेट्ये

राज्यातील विविध भागातील खाणी सुरु करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. दरम्यान, खाणी सुरु करताना नागरिकांचाही विचार केला जावा असे मत मांडत डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी ते खाणींच्या विरोधात नसल्याचे नमूद केले.

उत्तर गोवा: रस्ते खोदकामावर बंदी

उत्तर गोव्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार 6 ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी उत्तर गोव्यातील सर्व प्रकारच्या रस्त्यांच्या खोदकाम किंवा कोणत्याही विकास कामावर बंदी असणार आहे.

इतरांना शिस्तीचा उपदेश करणाऱ्यांनी आधी आपले कर्तव्य पार पाडावे!

वृत्तपत्र स्वातंत्र्याचे संरक्षण करणे आवश्यक. लोकशाहीत, घटनात्मक पदावरील व्यक्तीनेच पत्रकारांना धमकावणे अत्यंत दुर्दैवी. जे इतरांना शिस्तीचा उपदेश करतात त्यांनी विश्वासघातकी आणि पक्षांतर करणाऱ्यांविरुद्धच्या याचिकांवर निर्णय देण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे. अमित पाटकर यांचा तवडकरांना टोला

मडगाव ESI रुग्णालय कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन होणार 25 हजार

मडगाव ESI रुग्णालय कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन दहा हजारावरुन 25 हजार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली.

माजी मंत्री प्रकाश वेळीप यांना विधानसभेत बोलवून जाब विचारणार - सभापती तवडकर

माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. अधिवेशन सुरु असताना आरोप करुन त्यांनी सभापती म्हणून विशेषाधिकारांचा अपमान केला. विधानसभेत बोलवून त्यांना जाब विचारणार असल्याचे सभापती रमेश तवडकरांनी सांगितले.

पणजी, पर्वरीतील वाहतूक कोंडीचा मुद्दा सरदेसाईंकडून उपस्थित

कचरा प्रश्न!  रेजिनाल्ड, सरदेसाई आणि मुख्यमंत्री आमने सामने

कचरा प्रश्नावरुन विजय सरदेसाई, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी मंत्री आलेक्स सिक्वेरांना प्रश्न विचारला. यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मध्यस्थी करुन मडगाव पालिकेने कचरा जमा करु नये त्याचे पैसा जमा करुन त्यांची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापनाकडे सोपवा त्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी आमची असेल असे सावंत म्हणाले.

फोर्टीफाईड राईस गरिबांसाठी - रवी नाईक

रेशनमधून दिली जाणारा फोर्टीफाईड राईस गरिबांसाठी असून, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी मुंबईला पाठवला जातो असे, स्पष्टीकरण कृषीमंत्री रवी नाईक यांनी दिले. कार्लुस फेरेरा यांनी याबाबत प्रश्न विचारला होता

तब्बल 50 सागरी कासवांनी मोरजी किनारी 5000 हजार पेक्षा जास्त अंडी घातली. जानेवारी ते फेब्रुवारी या दीड महिन्यात विक्रमी सागरी कासवांची किनाऱ्यावर हजेरी.

वास्कोतील फिश मार्केट बांधकामाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

वास्कोत सुरू असलेल्या फिश मार्केट बांधकामाची मुरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष मासे विक्रेत्यांसह तपासणी करत आहेत.

विधानसभा अधिवेशनाच्या पाचव्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात...

हळदोण्यात 70 वर्षीय वृद्धाची आत्महत्या!

कारोणा, हळदोणा येथे एका 70 वर्षीय वृद्धाने स्वतःलाच पेटवून आत्महत्या केली. म्हापसा पोलिसांनी अनैसर्गिक म्हणून घटनेची नोंद केली. मयत हा मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची प्राथमिक माहिती.

राज्यपाल डिचोलीत; कावी कलाकृतींची करणार पाहणी

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे अडवलपाल गावात भव्य स्वागत. श्री शर्वाणी देवीसह देवतांचे घेतले दर्शन. कावी कलेची पाहणी करण्यासाठी राज्यपाल पिल्लई शुक्रवारी डिचोलीत. कावी कलेसंबंधी राजभवन येथे आयोजित केलेल्या 5 दिवसीय कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची ही भेट आहे.

मोरजीतील श्री सत्पुरुष मंदिरातील फंडपेटी चोरट्यांनी फोडली!

मोरजी येथील श्री सत्पुरुष देवाची फंडपेटी चोरट्यांनी आज (ता.9) पहाटे फोडली. जवळच असलेल्या डोंगरावर पेटी नेवून त्यातील पैसे पळवले. देवस्थानने दोन वर्षे फंड पेटी उघडली नव्हती, त्यामुळे त्यात हजारो रुपये होते. चोरट्यांनी फंडपेटी फोडून पेटीत 1000 रुपये सोडले आणि इतर पैसे चोरले. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com