Goa Budget Session: तारांकीत प्रश्नांच्या यादीची जुनी पद्धतच सुरु ठेवा; विरोधकांचे सभापतींना निवेदन

विधानसभा कामकाजावर बहिष्कार घालण्याचा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा इशारा
Opposition members submit memorandum to Speaker
Opposition members submit memorandum to Speaker Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Budget Session 2024: विधानसभेच्या तारांकीत प्रश्नांची यादी ठरविताना सत्ताधारी व विरोधी असे आलटुन पालटुन सोडत क्रमांक घेणारी यापुर्वीची प्रथा चालूच ठेवावी, अशी मागणी विरोधी पक्षातील आमदारांनी केली.

याबाबतचे निवेदन आमदारांनी विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांना देण्यात आले.

यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, ॲड. कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्‍टा आणि क्रुझ सिल्वा उपस्थित होते.

निवेदनावर उपस्थित आमदारांसह विजय सरदेसाई, कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस, आणि वीरेश बोरकर यांनी सही केली आहे.

Opposition members submit memorandum to Speaker
Goa Assembly: ...तर अधिवेशनावर विरोधकांचा बहिष्कार

विधानसभेत विरोधी आमदारांची संख्या कमी असल्याने सत्ताधारी व विरोधी आमदारांचे प्रश्न त्या तुलनेत निवडण्याचे ठरवल्यास विरोधी आमदार विधानसभा कामकाजावर बहिष्कार घालतील, असा इशारा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिला आहे.

अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी या आर्थिक वर्षात केवळ 10.51 टक्केच खर्च झाला आहे. यामुळे सरकार नापास झाल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, दुहेरी नागरीकत्वाच्या मुद्यावर खासगी ठराव मांडण्याचे ठरले असल्याचे आलेमाव यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com