Goa News: संविधानामुळे लोकशाही मजबूत

Goa News: राज्यपाल श्रीधरन पिल्लई : मयेतील सरपंच, पंचांशी साधला संवाद
Goa News | Governor Sreedharan Pillai
Goa News | Governor Sreedharan PillaiDainik Gomantak

Goa News: भारतीय संविधान श्रेष्ठ असून या संविधानामुळे लोकशाही मजबूत आहे. त्यामुळेच प्रत्येक नागरिक सुप्रिम आणि परमेश्वरासमान आहे, असे मत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी व्यक्त केले.

मये मतदारसंघाच्या दौऱ्यावेळी मतदारसंघातील सरपंच, पंच सदस्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. गोवा हे देशातील असे एकमेव राज्य आहे, की या राज्यात एकता आणि नागरिक गुण्यागोविंदाने नांदत आहेत, असे गौरवोद्गारही राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी काढले. ‘संपूर्ण गोवा यात्रा’ अंतर्गत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी मये मतदारसंघाचा दौरा केला.

या दौऱ्या दरम्यान शिरगाव येथील लईराई देवस्थान सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीस मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन, डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, मामलेदार राजाराम परब, गटविकास अधिकारी श्रीकांत पेडणेकर, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर आणि महेश सावंत, लईराई देवस्थानचे अध्यक्ष गणेश गावकर आणि सरपंच करिश्मा गावकर उपस्थित होते.

आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मये मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून सरकारच्या मदतीने ते सुटणार, असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. सरपंच करिश्मा गावकर यांनी स्वागत केले. प्रेमानंद महांब्रे यांनी आभार मानले. राष्ट्रगीतानेच कार्यक्रमाची सांगता झाली.

Goa News | Governor Sreedharan Pillai
Goa Human Trafficking: 'वेश्याव्यवसायासाठी' महिलांची तस्करी गोव्यात सर्वाधिक

राज्यपालांचे आभार

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी डायलिसिस आणि कर्करोगग्रस्तांची त्यांच्या आरोग्याविषयी विचारपूस करून त्यांना मदतीचे धनादेश वितरित केले. यावेळी तेथे आलेल्या डायलिसिसचे उपचार घेणाऱ्या रुग्णांनी तसेच कर्कग्रस्तांनी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे आभार मानले.

सरपंचांनी मांडले प्रश्न :

मये मतदारसंघातील विविध पंचायतींच्या सरपंचांनी पंचायत क्षेत्रातील प्रमुख प्रश्न मांडून ते राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना सादर केले. अन्य समस्या सोडवितानाच मयेतील स्थलांतरित मालमत्ता प्रश्न विनाविलंब निकालात काढावा, अशी मागणी मयेचे सरपंच दिलीप शेट यांनी केली.

चोडण येथील प्रलंबित पुलाचे काम मार्गी लागावे, अशी मागणी चोडणचे सरपंच पंढरी वेर्णेकर यांनी केली. वन-म्हावळिंगेतील जमीन मालकीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी सरपंच प्रियंवदा गावकर यांनी केली.

नार्वेचे सरपंच संदेश पार्सेकर, कारापूर-सर्वणचे सरपंच दत्तप्रसाद खारकांडे, पिळगावच्या सरपंच मोहिनी जल्मी आणि शिरगावचे पंच सूर्यकांत पाळणी यांनी आपापल्या पंचायत क्षेत्रातील समस्या मांडल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com