Goa Beach : मोबाेर समुद्र किनाऱ्याकडील रस्‍त्‍यांवर उभारले सूचना फलक; किनाऱ्यावर वाहनांना प्रतिबंध

Goa Beach : जेणेकरून समुद्रकिनारा प्रत्‍येकासाठी सुरक्षित राहील. लोकसभा निवडणुकीमुळे या फलकांच्‍या अंमलबजावणीला उशीर झाला, परंतु निवडणूक प्रक्रिया संपल्‍यानंतर पंचायतीने आपले प्रलंबित काम पुन्‍हा सुरू केले आहे.
Goa Beach
Goa Beach Dainik Gomantak

Goa Beach :

मडगाव, सुरक्षितता वाढविण्‍यासाठी आणि स्‍थानिक समुद्र किनाऱ्याची पूर्वस्‍थिती जपण्‍यासाठी केळशी ग्रामपंचायतीने मोबोर येथील समुद्र किनाऱ्याच्‍या रस्‍त्‍यांवर सूचना फलक लावले आहेत. या उपक्रमाचा उद्देश पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावर वाहन चालवण्‍यापासून रोखणे हा आहे.

असे प्रकार स्‍थानिक रहिवासी आणि पर्यटक या दोघांसाठीही चिंताजनक ठरले आहेत. केळशी पंचायतीचे सरपंच डिक्‍सन वाझ म्‍हणाले, की आम्‍ही अनेक पर्यटकांना समुद्र किनाऱ्यांवर नियमांच्‍या विरोधात जाऊन वाहन चालवताना पाहिले आहे. नवीन फलक त्‍यांना सूचित करण्‍यासाठी आणि मार्गदर्शन करण्‍यासाठी आहेत.

Goa Beach
Quepem Goa News : जलप्रकल्पाआडून मिराबागमध्ये पर्यटनस्थळ नकोच! ग्रामस्थांचा विरोध

जेणेकरून समुद्रकिनारा प्रत्‍येकासाठी सुरक्षित राहील. लोकसभा निवडणुकीमुळे या फलकांच्‍या अंमलबजावणीला उशीर झाला, परंतु निवडणूक प्रक्रिया संपल्‍यानंतर पंचायतीने आपले प्रलंबित काम पुन्‍हा सुरू केले आहे.

नजीक पाेहाेचणारा पावसाळ्याचा मोसम लक्षात घेऊन घरांच्‍या दुरुस्‍तीशी संबंधीत कामे आणि पावसाळ्‍याची तयारी सुरू करण्‍यात आली आहेत, असे वाझ पुढे म्‍हणाले. आम्‍ही सामाजिक जबाबदारीच्या माध्‍यमातून खरोखर गरज असलेल्‍या लोकांच्‍या घरांची दुरुस्‍ती केली आहे. पावसाळ्‍यानंतर आणखी अनेक उपक्रम हाती घेतले जातील, असे सरपंचांनी

सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com