Goa beach lifeguard: दृष्टी मरीनच्या तपशीलवार अहवालात समुद्रातील लाटा आणि अस्थिर पाण्यासारख्या धोक्यांना सर्वाधिक धोका असलेले समुद्रकिनारे देखील ओळखले आहेत. उत्तर गोव्यातील केरी, अश्वे, स्वीट लेक, वागातोर, हणजूण, सिकेरी, बागा आणि कांदोळी यांसारखे किनारे देखील रिप्टाइड्स आणि अस्थिर पाण्याचा सर्वाधिक प्रवण म्हणून ओळखले गेले आहेत.
दृष्टी मरीनतर्फे समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्यांना सुरक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेताना त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीबद्दल नेहमी जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे लाल ध्वज असलेल्या भागात पोहणे टाळणे, जे अस्थिर आणि उच्च रिप्टाइड्सचा इशारा देतात, नॉन-स्विम झोन म्हणून चिन्हांकित केलेल्या भागात प्रवेश करणे टाळणे, समुद्रकिनाऱ्यावर लावलेल्या सूचना आणि संकेत फलकांचे पालन केले जात असल्याची खात्री करणे, यांचे पालन करणे गरजेचे आहे.
किनाऱ्यावर धमाल करण्यासाठी आलेल्या प्रत्येकाने या गोष्टी पाळल्या पाहिजेत, जेणेकरून समुद्रात होणारे अपघात टाळता येतील, असे मत दृष्टी मरीनचे ऑपरेशन्स हेड नवीन अवस्थी यांनी व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.