Goa Beaches: डच तंत्रज्ञान रोखणार किनाऱ्यांची झीज! हॉलंडचे खास पथक लवकरच गोव्यात दाखल होणार

Goa Beaches: पर्यावरणमंत्री काब्राल : पाहणीसाठी डिसेंबरमध्ये येणार
Goa Beaches:
Goa Beaches: Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Beaches: राज्यातील किनाऱ्यांची झीज रोखण्यासाठी डच तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणार आहे. त्यासाठी गोव्यातील किनाऱ्यांची पाहणी करण्याकरिता डिसेंबरमध्ये हॉलंडमधील ‘डेल्ट्रास’ या सरकारी संशोधन संस्थेचे पथक डिसेंबरमध्ये गोव्यात येणार आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

हॉलंडच्‍या दौऱ्यावरून परतल्‍यानंतर त्‍यांनी ही माहिती दिली. या दौऱ्यावर त्‍यांच्‍यासमवेत पर्यावरण सचिव अरुणकुमार मिश्रा व पर्यावरण संचालक डॉ. स्नेहा गीते यासुद्धा गेल्‍या होत्‍या.

हॉलंडमध्येही अनेक वर्षांपासून किनाऱ्यांची झीज होत होती. गोव्यासारखेच तेथे सुंदर किनारे आहेत. तेथील संशोधकांनी पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने किनाऱ्यांची झीज, धूप थोपविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

गोव्यातील किनाऱ्यांचीही झीज अनेक वर्षे होत आहे. ती रोखण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या ट्युब्‍स घालण्यात आल्या, त्रिकोणी आकाराचे दगड पेरण्यात आले. मात्र हे सारे उपाय अशास्त्रीय होते हे नंतर सिद्ध झाले. ते कुचकामीही ठरले. त्यामुळे शाश्वत अशा उपायांच्या शोधात आम्ही होतो, असे काब्राल यांनी सांगितले.

दरम्‍यान, पोर्तुगालमध्‍ये ‘शाश्वत निळी अर्थव्यवस्था’ या विषयावरील परिषदेतील एका परिसंवादात काब्राल सहभागी झाले होते. या परिषदेचे उद्‍घाटन पोर्तुगालच्या पंतप्रधानांनी केले.

यावेळी किनारी भागातील रोजगार संधी, शाश्‍वत विकासासाठी गोवा सरकारने टाकलेली पावले, किनारी पर्यावरणाच्या रक्षणासाठी केली गेलेली उपाययोजना यावरील माहिती काब्राल यांनी चर्चासत्रात दिली.

किनाऱ्यांबाबत हॉलंडमध्ये यशस्वी प्रयोग करण्‍यात आल्‍याची माहिती मिळाली. पोर्तुगालमध्ये मला एका पर्यावरणविषयक परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले होते.

तेच निमित्त साधून हॉलंडमधील किनाऱ्यांची पाहणी केली. तब्बल साडेसहा किलोमीटरचा किनारा पायी फिरून काढला. तो किनारा काही वर्षांपूर्वी वाहून गेला होता. गेल्‍या १२ वर्षांत तो पूर्ववत करण्यात आला आहे.

- नीलेश काब्राल, पर्यावरणमंत्री

Goa Beaches:
Subhash Phaldesai: खाणी सुरू करण्यासाठी आंदोलन करणारे आयआयटीसाठी रस्त्यावर उतरत नाहीत हीच शोकांतिका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com