Goa Assembly Session: कापोर्डेतील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक वृत्त, बारा वर्षांपासूनच्या पायपीटीचा प्रश्न सुटणार..

पुन्‍हा धावणार ‘कदंब’ : आमदारांनी उठविला विधानसभेत आवाज
Divya Rane
Divya RaneDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Monsoon Session सत्तरी तालुक्‍यातील कोपार्डे गावात गेल्या बारा वर्षांपासून सकाळच्या वेळी एकच कदंब बस येत असल्याने दुपारच्या वेळी घरी जाताना विद्यार्थ्यांना पायी घर गाठावे लागते. याबाबत आमदार डॉ. दिव्‍या राणे यांनी आज सभागृहात आवाज उठविला.

त्‍यामुळे ही समस्‍या मार्गी लागणार याची खात्री कोपार्डेतील लोकांना विशेषत: विद्यार्थ्यांना झाली असून लवकरच विद्यार्थ्यांची समस्या दूर होणार आहे.

कोपार्डे गावातील विद्यार्थ्यांना गेल्या १२ वर्षांपासून उच्च शिक्षणासाठी वाळपईत जावे लागते. सुमारे पाच किलोमीटरचे अंतर कापावे लागते. गावात सुमारे पन्नासच्यावर विद्यार्थी आहेत. सकाळच्या वेळी सातच्यादरम्यान एक कदंब बस वाळपईला या विद्यार्थ्यांना घेऊन जाते.

Divya Rane
Subhash Faldesai: ‘आयआयटी’साठी 3 महिन्यांत जागा निश्चित करणार; सांगेसह काणकोण पर्यायही उपलब्ध

मात्र दुपारच्या वेळी घरी परत असताना विद्यार्थ्यांचे तसेच नागरिकाचे मोठे हाल होत आहेत. कारण दुपारच्या वेळी ज्या वाळपई ठाणे मार्गावरुन कदंब किंवा इतर खासगी बसेस जातात, त्‍या भरलेल्‍या असतात.

त्यामुळे कोपार्डे गावातील विद्यार्थ्यांना या बसमध्ये स्थान मिळत नाही. कित्येक वेळा या विद्यार्थ्यांना ताटकळत रस्त्यावर दुसऱ्या बसची वाट पाहावी लागते. तर बहुतांश विद्यार्थ्यांना पायी चालत घरी जावे लागते.

Divya Rane
Porvorim Theft Case: गोवा वेल्हामधील दुचाकी चोरीप्रकरणी एकाला अटक; पर्वरी पोलिसांची कारवाई

रोजंदारीवर जाणाऱ्या कामगारांचेही हाेतात मोठे हाल

कोपार्डे हा ग्रामीण भाग असल्याने कित्येक जण गरीब कुटुंबातील आहेत. तसेच रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या नागरिकांना दुपारी घरी जाताना बस नसल्याने त्‍यांचे हाल होतात. सध्या पाऊस सुरू असल्याने पावसातच मुलांना भितच चालत जावे लागते आहे.

त्यामुळे कोपार्डे गावात पुन्हा दुपारची दोनची कदंब बससेवा सुरू करावी यासंबंधीची मागणी वारंवार होत होती. यासंबंधी आमदार डॉ. दिव्या राणे यांना गावातील विद्यार्थ्यांनी कदंब बससेवा सुरू करण्यासंबंधीचे पत्र आज सकाळी दिले. तसेच या पत्राची प्रत कदंब महामंडळाच्या वाहतूक खात्यालाही देण्यात आली आहे. आमदारांनी हा प्रश्‍‍न आज विधानसभेत मांडला.

Divya Rane
Goa Dengue Case: धक्कादायक! म्हापशात डेंग्यूचा फैलाव; आतापर्यंत 'एवढ्या' रुग्णांची नोंद

कापार्डेवासीयांनी मानले आभार

आमदार डॉ. दिव्‍या राणे यांनी कदंब बससेवेबाबत आज मंगळवारी विधानसभेत आवाज उठविल्‍यामुळे कोपार्डेतील ग्रामस्‍थांनी समाधान व्‍यक्त करून त्‍यांचे आभार मानले आहेत. आता ही समस्‍ता लवकरात लवकर मार्गी लागणारच असा त्‍यांचा ठाम विश्‍‍वास आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com