Goa Assembly: "बंगळुरूमध्ये चालतं, मग गोव्यात का नाही?" रात्री 1 पर्यंत रेस्टॉरन्ट सुरू ठेवण्याबाबत सरदेसाईंचा सवाल, CM सावंतांकडून सकारात्मक उत्तर

Goa Assembly Session: गोवा विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी राज्यातील रेस्टॉरन्ट्स रात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी केली.
Goa Assembly
Goa AssemblyDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी राज्यातील रेस्टॉरन्ट्स रात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी केली. त्यांनी सभागृहात सांगितले की, “बंगळुरूमध्ये रेस्टॉरन्ट्स रात्री १ पर्यंत खुले असतात, मग पर्यटनप्रधान गोव्यात असे का होत नाही?” या प्रस्तावामागे राज्याच्या नाईटलाइफला चालना देऊन पर्यटन क्षेत्राला अधिक बळकटी देण्याचा हेतू असल्याचेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

सरदेसाई यांनी दावा केला की, रेस्टॉरन्ट्स आणि शॅक रात्री उशिरापर्यंत खुले राहिल्यास देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांचा मुक्काम वाढेल, त्यातून स्थानिकांना रोजगार व आर्थिक लाभ होईल. त्यांनी उदाहरण देत म्हटले की, अनेक पर्यटन शहरांमध्ये ही सुविधा दिली जाते आणि त्यामुळे तेथे पर्यटकांची संख्या वाढते.

Goa Assembly
Goa Assembly: विरोधकांची हौद्यात धाव! गदारोळातच 4 विधेयके मंजूर, दोनवेळा कामकाज तहकूब; वाचा घटनाक्रम..

यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली. त्यांनी सांगितले की, “जर पर्यटन वाढीस मदत होत असेल, तर बंगळुरूप्रमाणे गोव्यातही रेस्टॉरन्ट्स रात्री १ पर्यंत सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.” त्यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, राज्य सरकार रात्री १० वाजल्यानंतर ते पहाटे १ वाजेपर्यंत शॅक, रेस्टॉरन्ट्स आणि लग्न समारंभांसाठी परवानगी देण्याबाबत गंभीरपणे विचार करत आहे.

तथापि, मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी हेही सांगितले की, पर्यावरणप्रेमी याला विरोध करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा सुरू असलेल्या रेस्टॉरन्ट्स आणि संगीत कार्यक्रमांमुळे आवाज प्रदूषण, कचरा समस्या आणि वाहतूक कोंडी वाढते, ज्यामुळे स्थानिकांच्या शांततेत व्यत्यय येतो. “पर्यटन आणि स्थानिकांच्या जीवनमानाचा समतोल राखणे आवश्यक आहे. हा फक्त परवानगी देण्याचा मुद्दा नाही, तर पर्यावरणाशी संबंधित तक्रारींचाही आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

Goa Assembly
Goa Crime: इन्स्टाग्रामवरून फसवणूक! कुडचडेतील 'त्या' तरुणाच्या जाळ्‍यात अडकल्‍या अनेक युवती; अजून 5 जणांची चौकशी

गोव्यात रात्री उशिरापर्यंत रेस्टॉरन्ट्स सुरू ठेवण्याचा विषय यापूर्वीही अनेकदा चर्चेत आला आहे, मात्र स्थानिक हितसंबंध आणि पर्यटनविकास यांच्यातील ताणतणावामुळे अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. मुख्यमंत्री सावंत यांनी आश्वासन दिले की, या विषयावर सर्व संबंधित घटकांशी चर्चा करूनच पुढील पाऊल उचलले जाईल, असं त्यांनी सांगितलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com